Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९३ )

वरून कोणती गोष्ट प्रनुखत्वानें आपणास दृग्गोचर होत आहे ! तो गोष्ट ही आहे कीं, काहीं ही झाले तरी मनुष्यानें इमानी आचरण, व सत्य आणि सरळ भाषण यांचा कर्धी ही त्याग करू नये; अशा उदात्त तत्वांचा, हिदूलोकांच्या मनावर अनादि- काला पासून पिढ्यानुपिढया सारखा परिणाम होत आलेला आहे; आणि ह्रींच उदात्त तत्वें नेहमीं वाचण्यांत, ऐकण्यात व मनन करण्यात येत असल्यामुळे हिंदू समाजांत शील है पुष्कळच प्रमाणाने आजही कायम असल्याचे निदर्शनांस येत आहे; शिवाय हा हिंदू समाज, इंग्लंडांत ज्या प्रमाणे सॅक्सन व नार्मन या दोन जातींचा एक दोन शतकांतच एक जीव झाला, त्याप्रमाणे हिंदूंचा, नुसलमान अथवा इतर कोणत्याही जाती बरोबर एक जीव न होता, राजकीय, सामाजिक, औद्योगिक, व सांपत्तिक वगैरे बाबतीतील त्यांच्या आजच्या पडक्या स्थितीतही पुष्कळच सुधारलेला, सुशील, व श्रेष्ट असल्याचेंच निदर्शनास येत आहे; आणि भाषा, धर्म, पुराणे, तत्वज्ञान, तसेच कायदा, चालीरीती, प्राचीन कला, अथवा प्राचीन शात्र, या पैकी कोणताही मानवी बुद्धीचा विषय आपल्या अभ्यासा करिता तुम्ही पसंत करा; प्रत्येक बावर्तीत, तुम्हाला आवडो अथवा न आवडो, तुम्हांस हिंदुस्थान देशाकडेसच धांव व्यावी लागेल; कारण मानवी इति- हामांतील अत्यंत अमूल्य व अतीशय उपयुक्त साधन सामुग्री पैकी बरीच सामुग्री हिंदुस्थानांत आणि फक्त हिंदुस्थानातच संग्रहित केलेली आहे, " अर्से प्रोफेसर मॅक्स मुल्लर यानें इ० सन १८८२ मध्ये हिंदी सनदी नौकरीच्या उमेदवारां- पुर्डे भाषण करिताना जे स्तुतीपर उद्गार काढले तेही वस्तुस्थितीस धरूनच आहेत, ही ही गोष्ट उघड आहे.
 त्या प्रमाणेच, प्रसिद्ध इतिहासकार, निरिक्षक, व मुत्सद्दि, अबुल फज्ल हा असें म्हणतो कीं, "एकंदरीनें पाहता हिंदू लोक हे स्वधर्मनिष्ट, मन मिळाऊ, आनंदी, विद्यार्जनरत, न्याय प्रीय, कृतज्ञ, सत्य प्रीय आणि अत्यंत इमानी असून परकीयार्शी ते प्रेमाने वागढात. आपल्या कामाकाजांत ते दक्ष आणि हुपार असतात, आणि दुसऱ्याच्या भानगडीत ते पडत नाहींत; समरांगणांतून


 महाभारतातील ताकद भोग्न वगैरेंची ही अशाच प्रकारची कित्येक उदाहरणे स्थलाभावामुळे या ठिकार्गो ग्रंथित केली नाहींत.
 १३