Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रास्ताविक माहिती,
विषयोपन्यास

 सदरहू ग्रंथ, हा 'मराठ्यांचा इतिहास' म्हणून असून, त्यात हिंदुस्थानां- तील मराठा साम्राज्याच्या उदयापूर्वीची स्थिति उदय व त्याचा क्रमाक्रमानें झालेला विस्तार, वगरे सर्व हकीकत मराठेशाहीच्या अखेरच्या काळापर्यंत ग्रंथित केलेली आहे. 'मराठे' हे हिंदुस्थानांतील पहिले राज्यकतें नाहींत, आणि मराठ्यांपूर्वीच्या भोगली राज्याच्या काळापूर्वीही हिंदुस्थानात मोठमोठी साम्राज्ये, व प्रख्यात व प्रजाप्रिय राज्यकर्ते निर्माण होऊन गेलेले आहेत; म्हणून हिंदु- स्थानातील पूर्वकालीन राज्यांची माहिती, त्यांतील सुधारणा. प्राचीन आर्यांची संस्कृति, प्रजेच्या सुखसोयीसाठी त्यांनी ठरविलेले नियम व राज्यपद्धति त्यांचा राज्यविस्तार व राज्यकारभार, वगैरे अनेक उपयुक्त गोष्टीची माहिती मुसलमानी काळांतील मराठ्यांच्या राजकीय स्थिति व महत्त्वासह वास्ताविक माहिती हाणून पहिल्याने त्रोटक रीतीने या ठिकाणी ग्रंथित केली आहे, आणि कोणत्याही विशेष इतिहास माहीत नसलेल्या वाचकांस मराठे व त्यांच्या आनुषंगिक आवश्यक म्हणून असलेली प्रत्येक माहिती एकाच ठिकाणी वाचण्यास मिळावी, अशी या ग्रंथाची योजना केली आहे; त्यामुळे कित्येकदां द्विरुक्ति होण्याचा, अथवा कदाचित् आवश्यक असणारी, पण तसें न वाटणारी, अथवा न दिली तरी मुद्धां चालणारी, माहिती दिल्याचा, समज होण्याचा संभव आहे; परंतु हा इति• हास विस्तृत, साग्र, विविध उपयुक्त, आवश्यक व आनुषंगिक माहितीपूर्ण अताच लिहिण्याचा मूळपासून विचार असल्याने तशी माहिती त्यांत प्रथित करणे आवश्यकच आहे; व ही दृष्टि एकदा कायम ठेवून त्या अनुरोधाने या ग्रंथाचे परिशीलन केलें, म्हणजे त्यांत विसंगत असें कांहींच नाहीं, तर उलट त्यांत दिलेली प्रत्येक माहिती आवश्यक, निदान आनुषंगिक अशीच आहे, ही गोष्ट सहज लक्षांत येण्यासारखी आहे.
 शिवाय, या पूर्वकालीन हकीकतीमध्यें, प्राचीन आर्य लोक रानट होते- का सुधारलेले होते, त्यांनी स्थापन केलेलीं अनेक साम्राज्ये वैभवसंपन्न, सुब्ध-