Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८८ )

अनेक क्रांत्या झाल्या; आणि पठाण, मोंगल, मराठे, शीख व इंग्रज हे क्रमाक्रमानें हिंदुस्थानचे राज्यकर्ते झाले; परंतु ग्रामपंचायती पूर्वी होत्या तशाच कायम आहेत; गांवांतील जमातींचे अथवा पंचायतींचें, प्रत्येक जण आपापले लहानसे स्वतंत्र राज्य त्यांत बनवून, असणारें हैं ऐक्य, हे हिंदू लोकांच्या सुखांस आणि बहुताशीं स्वातंत्र्य व मोकळेपणा यांना कारणीभूत झालेले आहे. +
 ग्राम पंचायती प्रमाणेच, प्राचीन आर्य लोकांचे शील कसें होतें, म्हणजे त्यांची दानत ( Character ) किती प्रसंशनीय होती, या विषयीं ही इतिहासांत अनेक निरनिराळ्या प्रकारचे व प्रसंगाचे दाखले आढळतात; सत्य हा जगाचा ज्ञानदीप आहे; शील ओळखण्याचे मुख्य साधन सत्य है आहे; सत्य ही जगां- तील पवित्र, भेष्ट, व अविनाशी वस्तू आहे; आणि मानवी जगांत सत्य हा श्रेष्ट तम, प्रधान व अमोल्य असा माननीय सद्गुण म्हणून मानिलेला असून मानवी प्राण्याच्या आयुष्यांत त्यास तो तारक म्हणून, ब त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या सद्गतीस मार्ग दर्शक व मदतगार म्हणून, ठरलेला आहे. आणि सत्याच्या नर- डीस नख देणारा मनुष्य कुमार्ग गामी होण्यास प्रारंभ होऊन, संवईने अट्टल खोटे बोलणारा म्हणून मानिला जाऊन तो सत्य भाषणीं व सत्याचरणीं समाजां- वील महारोग म्हणून गणिला जात आहे; या बाबतींत ऐतिहासिक दाखले देऊन असें निर्विवादपणे सिद्ध करून देता येईल कीं, अनादि काला पासून हिंदू लोक हे सत्यवादी म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि तशी त्यांची सर्व देशांतील व सर्व जातींच्या लोकांनीं तारीफ केलेली आहे. या बाबतींत स्ट्राबो म्हणतो


 The villege communities are little republics having near- ly every thing they can want within themselves and almost indepen- dent of any foreign nation. They seem to last where nothing else iasts Dynasty after dynasty tumbles down, revolution succeeds revo- lution, and Pathan, Moghal, Mahratta, Sike, British, are all masters in turn, but the village communities, romain the same. This union of village communities, each one forming a seperate little state in itself, is in & bigh degree conducive to their ( Hindu's ) happiness, and to the enjoyment of a great portion of freedom and independence"

(See Report of the Select Committee of the House of

Commons; 1832. Vol. III. Appendices Page 33.