Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८९ )

कीं, हे (हिंदू) लोक इतके इमानी आहेत की, त्यामुळे त्यांना आपल्या घरानां कुलुपेंही लावावी लागत नाहींत, आणि त्यांनां दुसन्यात बांधून घेण्या- करितां लेखी करारही करावे लागत नाहींत. त्या प्रमाणेच इपिक्टिटसचा पट्ट- शिष्या एरियन हा दुसऱ्या शतकांत असें म्हणतो कीं, हिंदुस्थानांतील. कोणताहीं मनुष्य कधींही खोटें बोलल्याचे आढळून आले नाहीं. * एरियनच्या या लिहिण्यांत कदाचित् अतिशयोक्ति आहे असे ग्रहित धरिलें तरी त्यानें हिंदू लोकांबद्दल काढिलेले स्तुतीपर उद्गार खरोखरच मननीय आहेत, यांत संदेह नाहीं. प्राचीन चिनी प्रवासी ह्यूएनत्संग हा हिंदुस्थानवासियां विषयीं असे म्हणतो कीं, हे लोक, त्यांची सरळ व इमानी वागणूक यामुळे प्रसिद्ध असून संपत्ति विषय म्हणावयाचे म्हणजे ती अन्यायानें कधींही मिळवीत नाहींत; न्यायासंबंध म्हणावयाचे म्हणजे ते विशेषच सढळतेनें यागतात; आणि सरळपणा, त्यांच्या राज्यकारभाराचे विशिष्ट अंग आहे. त्याप्रमाणेच सयामच्या दरबारांतील खांग-थाय या नांवाचा चिनी वकील असे म्हणतो कीं, सू-वी या नांवाचा, सयामचा राजा फुंचन याचा एक नातलग इ. सन २३१ च्या सुमारास हिंदु- स्थानांत आला होता; आणि तो परत गेल्यावर त्याने सयामच्या राजास असें.. सांगितले कीं, हिंदुस्थानवासी लोक हे सरळ व इमानी आहेत; त्याप्रमाणेच पै- तू या नांवाचा, यांगती या चिनी बादशहाचा वकील इ० सन ६०५ मध्ये हिंदुस्थानांत आला होता; तो असे म्हणतो कीं, हिंदू लोक हे पवित्र शपथावर श्रद्धा ठेवितात; त्या प्रमाणेच तेराव्या शतकति शमसुद्दीन अबू अदुल्ला याने आपल्या ग्रंथांत असे लिहिले आहे कीं हिंदुस्थानातील लोक हे वाळूच्या खडया सारखे. असंख्य आहेत; ते फसवेगिरी व जोरजुलूम यांज पासून अलित आहेत, व प्रसंगी ते आपल्या जिवाची अथवा मृत्यूची पर्वा करीत नाहींत. ( Max.. Muller's India; What can it teach us; Page 24, 25). शिवाय चवथ्या शतकांत फ्रेअर जार्डनस यानें असे उदगार काढिले आहेत


 + They (Hindus) are so honest as nither to require locks to their doors nor writings to bind their agreements.

Strabo. Lib XV Page 488. (Editon 1987).

 * No Indian was' ever known to tell an untruth: Indica chap XII See also Mc. Crindle in Indian Antipuary; 1876.