Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८७ )

 जगाच्या इतिहासास प्रारंभ झाल्यापासून आजपर्यंत हिंदुस्थान देश हा कोणत्याना कोणत्या कारणामुळे जगांत श्रेष्ठ व अत्यंत महत्वाचा म्हणून गणला गेलेला आहे; व या देशाची नैसर्गिक रचना, हवापाणी, त्यांतील सुपीक, समृद्ध व सौंदर्यमय प्रदेश, मोठमोठ्या नद्या, पर्वत, निरनिराळ्या अपूर्व वनस्पती, व पशुपक्षी वगैरे अनेक गोष्टीमुळे या देशास जगांत अत्यंत महत्व प्राप्त झालेले आहे. प्रसिद्ध मुसलमान इतिहासकार अबदुला वासफ यानें आपल्या चवदाव्या शतकांत लिहिलेल्या “ताझियत्- अल्- अमसर् " या नांवाच्या ऐतिहासिक ग्रंथांत असे लिहिले आहे कीं, सर्व लेखकांच्या एकमताप्रमाणे "हिंदुस्थान " हा पृथ्वीवरील सर्व देशांमध्ये राहण्यास उत्तम देश असून तो जगांतील सर्व ठिकाणां- हून अधिक आनंददायक आहे; तेथील माती इतर देशांतील हवेहून ही अधिक स्वच्छ आहे, आणि तेथील हवा तर प्रत्यक्ष स्वच्छतेहून ही अधिक स्वच्छ आहे; व त्यांतील आनंददायक प्रदेश नंदन वनाच्या उपमेस योग्य आहे. ( Elliots History of India; Vol. III Page 28 and 29 पहा. ) त्या प्रमाणेच प्रोफेसर हिरेन याचें असें म्हणणे आहे कीं, हिंदुस्थान देशापासून फक्त बाकीच्या आशिया खंडानेंच नव्हे, तर पाश्चिमात्य जगाने सुद्धा आपले ज्ञान व धर्महीं मिळविलीं आहेत; * आर्य लोकांनी हिंदुस्थानात मोठमोठीं साम्राज्यें स्थापन केली, तरी त्यांनी आपापल्या साम्राज्यांतील ग्राम संस्था कायम ठेविल्या असून राज्यांतील अंतर्गत कारभाराचा पुष्कळ भाग प्रमुखत्वानें प्रजेच्या हातात होता; आणि पूर्व कालची राजकीय घटना व कायदे यांचे मनन केल्यास त्यांत लोकसत्तात्मकत्वाचा अंश वास करीत होता, असें जेम्स मिल्ल यानें कबूल केले आहे; शिवाय, सर चार्लस मेटकाफ यानें या बाबतींत असे उद्गार काढिले आहेत कीं, ग्रामपंचायती हों लहानशीं लोकसत्ताक राज्येंच असून त्यांना न्या प्रत्येक गोष्टीची आवश्यकता आहे अर्से वाटेल, त्या सर्व गोष्टी त्यांच्या जवळ आहेत, आणि इतर कोणत्याही परकीय राष्ट्रापासून त्या बहुतेक स्वतंत्र आहेत; ज्या ठिकाणीं इतर कोणतीही गोष्ट चिरकालीन टिकत नाहीं, त्या ठिकाणी या ग्रामपंचायती टिकल्या आहेत असे दिसते. घराण्यामागून घराणीं नामशेष झालीं;


 * India is the scuroe from which not only the rest of Asis, but. the whole Western World. ived their knowledge sad their religion. Professor Heeren's Histerical Reserches Vel. II Page 45.