Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८६ )

दित्य हे उभयतांही चक्रवर्ती राजे विद्येचे मोठे भोक्ते व विद्वानांचे पोशिंदे असून त्यांच्या कारकीर्दीत अनेक काव्यग्रंथ व नाटके निर्माण झालीं; त्यापैकी हर्षवर्धन हा स्वतःच कवी असून त्यानें “रत्नावली " या नांवाचे लिहिलेले नाटक प्रसिद्ध आहे. विक्रमादित्याच्या पदरीं नऊ अग्रगण्य कवी व तत्ववेत्ते असून त्यांना विक्रमादित्याच्या सभेतील नऊ रत्नें अशी संज्ञा होती. या पैक बृहत्संहिकार वराहमिहिर, प्रख्यात ज्योतिपी ब्रह्मगुप्त, किरात अर्जुनीय ग्रंथाचा कर्ता भारवी, वासवदत्ता नाटिकेचा कर्ता सुबंधू, शाकुंतल, रघुवंश, व मेघदूत, वगैरे अत्युत्कृष्ट ग्रंथाचा कर्ता कविकुलगुरू व काली देवाचा महान भक्त प्रसिद्ध कालीदास हे विक्रमादित्याच्या पदरीं होते त्या प्रमाणेच प्रसिद्ध वय्यकरण वामन, व काशीचा जयादित्य, कादंबरी नाटकाचा कर्ता बाण, दशकुमार चरित् या ग्रंथाचा कर्ता दंडिन् व भट्टीकाव्य आणि नीति शतक, या ग्रंथाचा कर्ताभतृहरी, हे सर्व हर्षवर्धन राजाच्या आश्रयास होते; त्या नंतर इ० सन ७३५ मध्ये उत्तर रामचरित्, व मालती माधव, वगैरे प्रसिद्ध नाटकांचा कर्ता भवभूती, शिशुपालवध या नाटकाचा कर्ता माघ, ( इ० स. ८६०) व राजशेखर, ( इ. सन ९१० ) वगैरे प्रसिद्ध ग्रंथकार निर्माण झाले; या वरून आर्याच्या तत्कालीन विद्याविषयक बाबतींतील प्रगतीची कोणास ही सहज कल्पना होईल.
 प्राचीन आर्य लोक रानडी नसून अत्यंत सुधारलेले होते, व जुन्या हिंदूकालांत निरनिराळ शास्त्र व विद्या यांत ते पारांगत होते, ही गोष्ट, किती तरी माहिती पुराव्यादाखल पुढे मांडून, सिद्ध करून दाखवितां येण्यासारखी आहे; तथापि स्थलाभावामुळे या ठिकाणी त्यासंबंध त्रोटक रित्याच, पण उल्लेख करणेच आवश्यक आहे. आणि त्यांसही तसेंच महत्वाचे कारण आहे; ते हैं की आर्य लोकांनी पूर्व कालांत जशीं मोठमोठीं साम्राज्य स्थापन केली, त्याप्रमाणेच प्रत्येक शास्त्रांत, विद्येत व कलांतही त्यांनी जगाच्या इतिहासात इतरांच्या मानानें इतक्या पूर्व कालापासूनच आपली अत्यंत प्रगती करून दाखविली अ.हे, आणि ही गोष्टच त्यांची लायकी, कर्तृत्वशक्ति, करामत व कर्तबगारी यांची द्योतक असून हल्लींच्या काळींही तीच आपणास समाधानाचे व अभिमानाचे एक आश्रयस्थान म्हणून शिलक राहिलेली आहे, हे कोणासही नाकबूल करितां यावयाचं नाही.