Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८५ )

अशा समजुतीने मुसलमान लोकांस त्यांचे शव दफन करावयास पाहिजे होते; परंतु त्याच्या शरिरावरील वस्त्र काढून पाहतां तेथें शव न आढळतो कांहीं सुंदर व सुवासिक फुले मात्र असलेली आढळून आली; नंतर त्यांपैकी अर्धी हिंदूंनी काशी येथे मोठ्या समारंभानें पुरिलों व दुसन्या अर्ध्या फुलांचं मुसलमानांनी ही अतीशय थाटानें धार्मिक अंत्यविधी प्रमाणे दफन केले.
 कबीर, नंतर चैतन्य या नांवाचा एक बंगाली ब्राह्मण, वैष्णव पंथाचा उपदेशक म्हणून (इ० सन १४८६ ते इ० सन १५२६ पर्यंत ) होऊन गेला. त्यानें विष्णु पूजे बरोबरच ओढ्या प्रांतांतील पुरी येथील जगन्नाथ देवाच्या पूजेचा ही उपदेश केला. गौतमद्धाप्रमाणेच अहिंसेवर त्याचा कटाक्ष असून परमेश्वरी शक्तीनें सर्व जाती सारदा शुद्ध होतात, आणि रक्ताच्या एका थेंबाचाही पात करणें, है पाप असून ते परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आहे, असे तो प्रतिपादन करीत असे. चेतन्यानंतर इ० सन १५२० च्या सुमारास उत्तर हिंदुस्थानांत बल्लभस्वामी या नांवाचा एक धर्मोपदेशक होऊन गेला; त्यानें श्रीविष्णूची उपासना, श्रीकृष्णाच्या रूपाने करावी, असा उपदेश केला. आणि देव हा एकच असून तो कृष्णाच्या रूपाने श्री विष्णू हाच आहे, आणि तो प्रार्थना व उपास तापास करण्याने अथवा रानावनांत किंवा विहारांत राहून देहास कष्ट दिल्याने संतुष्ट होत नाही, तर सुखाचे सेवन केल्यानें अथवा उपभोग्य वस्तूंचा उपभोग घेतल्यानेच तो संतुष्ट व प्रसन्न होतो असें त्यानें प्रतिपादन केलें; व अशारीतीनेंदिवर्मात निरनिराळे पंथ व निरनिराळी मतें प्रचारांत आली.
 वर लिहिल्या प्रमाणे जसें हिंदूधर्माचे मत मतांतरांनी का होईना पुनर ज्जीवन झाले, त्या प्रमाणेच या काळांत संस्कृत भाषा व ग्रंथ यांचेही पुनरज्जी वन होऊन अनेक विद्वान मंडळींनी निरनिराळे अमोलिक ज्ञान भांडार निर्माण केले. बौद्ध कालांत चरक व सुश्रुत यांनी वैद्य शालावर अमोलिक ग्रंथ निर्माण केले, व नागार्जुन या नांवाच्या प्रसिद्ध बौद्ध ग्रंथकारानें सुश्रुताच्या ग्रंथावर एक लोकमान्य टिकत्मिक ग्रंथ लिहून काढिला; हिंदू कालांत अठरा पुराणे व धर्मशास्त्रावरील इतर ग्रंथ निर्माण झाले. माळवा प्रांतांतील प्रसिद्ध राज्य- कर्ता विक्रमादित्य ( अजमास इ सन५३३ ते इ० सन ५८३) व कनोजचा राजा हर्षवर्धन ( इ० सन ६०६ ते इ. सन६४६ ) अथवा दुसरा शिला-