Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८४ )

तो म्हैसूरच्या राज्यांत गेला व तेथील जैनधर्मी राज्यकर्त्याच्या मनावर आपलीं मतें बिंबवून, व त्यास वैष्णव पंथाची दिक्षा देऊन, त्याने तिकडे आपल्या पंथाचा जानें प्रसार करण्यास सुरवात केली. तथापि रामानुज हा गौतमबुद्धा प्रमाणे सर्वांस उपदेश करीत नसून फक्त ब्राह्मणास व उच्च वर्णातील लोकांसच उपदेश करीत असे. रामानुजाच्या अनुयायास " श्री वैष्णव " असें म्हणत असून या पंथांचे मुख्य पीट कांचीवरम येथे आहे. रामानुजा नंतर अजमासें शंभर वर्षांनी रामानंद या नांवाचा त्याचा एक अनुयायी होऊन गेला; त्याने उत्तर हिंदुस्थाना मध्यें, "देव हा एकच असून त्यानें नांव " श्री विष्णू " हें आहे, व त्याचीच सर्वांनी उपासना व आराधना करावी," असा उपदेश केला. त्यानें आपले राह- याचे मुख्य ठिकाण बनारस उर्फ काशी हें केलें होतें; आणि तेथून तो आसपासच्या प्रदेशांत फिरून आपल्या पंथाचा, लोकांस उपदेश करीत होता. हा रामानुजा प्रमाणें विशेषतः उच्च वर्गातील लोकांसच फक्त उपदेश करीत नव्हता; तर बहुत करून खालच्या जातींतील लोकांसच तो उपदेश करीत फिरत होता; आणि त्यांच्या शिष्यांपैकीं खालच्या जातींतच त्याचे अधिक शिष्य झाले होते, या शिष्यांपैकी कबीर (इ. सन १३८० ते इ. सन १४२० हा एक असून त्यानें रामानंदाच्या मताचा बंगाल प्रांतांत उपदेश केला, व त्याकाळी उत्तरहिंदुस्थानांत मुसलमानांचा प्रसार झाला असल्यामुळे त्यानें हिंदू व मुसलमान या दोघांचाही एकाच धर्मांत समा- वेश करण्याचा प्रयत्न केला; तथापि कबीर हा जातिभेदाविरुद्ध असून त्याप्रमाणें तो लोकांस उपदेश करीत असे; व मूर्तिपूजा करणें हैं पाप आहे, म्हणून ती करूं नये, अर्से तो लोकांस सांगत असे. देव एकच आहे, त्यासच हिंदू व मुसलमान या उभयतांनीही पूजीत गेले पाहिजे, तो मनुष्याच्या हातांनी बांधलेल्या देवा- यांत रहात नसून मनुष्याच्या अंतःकरणांत राहतो, मानवी आयुष्य हा एक मायेचा अथवा कल्पनेचा खेळ आहे, व परमेश्वर हा खरा एकच असून त्यांच ज्ञान करून घेऊन त्याच्याठिकाणी अनन्य भक्ति ठेविली म्हणजे आत्म्यास शांती मिळते, असे त्यांचं मत होतें, व तेंच मत तो नेहमीं सरसकट प्रतिपादन करीत होता व तो हिंदू व मुसलमान या उभयतांनांही सारखाच पूज्य व प्रीय होता; या कबीराच्या मृत्यू नंतरची मोटी मनोरंजक हकीकत उपलब्ध आहे; ती अशी की तो ज्यावेळी मृत्यू पावला, त्यावेळीं तो हिंदू होता या समजुतीनं हिंदू लोकांस त्याचे कलेवर दहन करण्यास हवं होतें; उलट पक्षीं तो मुसलमान होता