Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८३ )

 हिंदू कालाच्या शेवटी शेवर्टी संस्कृत भाषा हळू हळू मार्गे पडत गेली; तथापि ब्राह्मण धर्माच्या पुनरजीवना बरोबर संस्कृत भाषा व संस्कृत ग्रंथोप्तत्ति यांचे ही पुनरज्जीवन झाले. शंकराचार्य हा आपल्या वयाच्या बत्तीसाव्या वर्षी ( इ० सन ७१० ते ७४२) हिमालय पर्वतावर केदारनाथ येथे मृत्यू पावला; तो शिवोपासक असून त्याने शिवाची व त्याची स्त्री देवी (पार्वती) हिची उपासना करावी, असा उपदेश केला. याच देवीस दुर्गा अथवा काळी देवी असे म्हणतात. शंकराचार्याचे अनुयायी "स्मार्त" या नावाने प्रसिद्ध असून त्यांनी म्हैसूर संस्थानांतील तुंगभद्रा नदीच्या उगमा जवळील अंगेरी येयें एक मठ स्थापन केला. या शिवाय शंकराचार्याने हिमालय पर्वतांत बद्रिनाथ येथें, पश्चिमेस काठेवाड प्रांतति द्वारका येथे, व पूर्वेस ओढ्या प्रांतांत जगन्नाथ अथवा पुरी येथें, असे तीन प्रसिद्ध मठ स्थापन केले; बहुजन समाजाची नवीन बौद्ध धर्मारीवल प्रवृत्ति पुन्हां हिंदू धर्माकडे वळवून घेण्यकरिता जेव्हां ब्राह्मण धर्म प्रवर्तकांनी बौद्ध धर्मातील कित्येक लोकप्रीय तत्वांचा आपल्या पुरातन हिंदू धर्मात समावेश करून घेतला, तेव्हां ते बुद्धास विष्णूचा नववा अवतार असे मानूं लागल, व शैव अथवा स्मार्त पंथा प्रमाणेच वैष्णव पंथ उत्पन्न झाला. शिवाय नवीन बैद्ध धर्मात दिसून येणाऱ्या गोष्टी-म्हणजे देवांच्या पुंस्त्री, विभूती, मूर्तिपूजा, पवित्र ठिकाणच्या यात्रा वगैरे-अशि- क्षित वर्गांनों आपला धर्म न सोडितां त्यांस चिकटून रहावे म्हणून, ब्राह्मण धर्मप्रवर्तकांनी आपल्या धर्मात सामील केल्या; त्यामुळे जनसमूहाचा ओघ बौद्ध धर्माकडून पुन्हां ब्राह्मण धर्माकडे परत फिरला; परंतु त्या बरोबरच मूळच्या धर्भात क्रांति होऊन पूर्वीचा ब्राह्मणधर्म व नवीन बौद्धधर्म यांचे मिश्रण होऊन हल्लींचा हिंदूधर्म निर्माण झाला; स्मार्त पंथा प्रमाणेच जो दुसरा वैष्णव पंथ उत्पन्न झाला त्याचा उपदेशक रामानुज हा असून त्याचा जन्म मद्रास नजीक एका खेडयांत इ० सन १९५० च्या सुमारास झाला. त्यानें लहानपणापासूनच चोल- राजांच्या राजधानीचे शहर कांचीवरम् येथें अभ्यास करून नंतर तो त्रिचनापल्ली जवळील श्रीरंगपट्टण येथे गेला; त्यावेळेपासून त्यानें वैष्णवधर्म प्रतिपादनास सुर- वात केली, व त्याच्या प्रसारार्थ त्यानें संस्कृत भाषेत अनेक ग्रंथ लिहिले. अशा रीतीनें वैष्णवधर्माचा उपदेश करीत तो सर्व हिंदुस्थानंभर फिरला; परंतु पुढे कांची येथील शिवोपासक चोल राजाने त्यास ठार मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे
.