Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८२ )

आर्याच्या मूळ वस्तिस्थानांतून त्यांनीं हिंदुस्थानांत प्रवेश केल्यानंतर हिंदुधर्म स्थापन झाला, व पुढे निरनिराळे धर्मपंथ निर्माण झाले; त्यापैकीं, हिंदुधर्मा- प्रमाणेच, बौद्ध व जैन धर्मही हिंदुस्थानांत निर्माण होऊन, त्यांतल्यात्यांत बौद्धधर्माचा लवकर व जोरानें अतीशय प्रसार झाला. त्यामुळे ब्राह्मणांनी बौद्धधर्मातील पुष्कळ गोष्टी आपल्या धर्मात घेतल्या आणि बौद्ध भिक्षु प्रमाणेंच त्यांनीं ही धर्मोपदेश, व विद्यादान या काम विशेष श्रम घेण्यास मुरवात केली. त्या मुळे हिंदूधर्माचें नवीन स्वरूप जोरांत येऊन चौद्धधर्माची शक्ति कमी झाली. या पुनरज्जीवनाच्या कामांत पहिला धर्मोपदेशक म्हणने बहार प्रांतांत राहणारा कुमारील भट्ट या नांवाचा एक मनुष्य असून तो सातव्या शतकाच्या अखेरीस होऊन गेला; हिंदूलोकांचे तत्वशास्त्रही याच काळांत जोरांत आले. या शास्त्राचे मुख्यतः सहा विभाग असून त्यास " षड्दर्शनें " असे म्हणतात; त्यापैकी पूर्वमिमांसा व उत्तर मिमांसा हे शेवटचे दोन भाग आहेत; पूर्वमिमांसेमध्ये ब्राह्मण वगैरे ग्रंथांतून सांगितलेल्या यज्ञ- कर्माचा समावेश केला आहे, व उत्तरमिमांसमध्ये उपनिषदांत वर्णन केलेला वेदांत धर्म प्रतिपादन केलेला आहे. या पैकी पूर्वमिमांसेवर जैमिनीची व उत्तर- मिमांसेवर बादरायणाची सूत्रे आहेत; चौद्ध धर्माच्या भरभराटीच्या काळांत या दोन्हींही मिमांसांचा लोप झाला होता; परंतु या वेळीं कुमारील भट्टानें पूर्व मिमांसेवर विस्तृत टिका लिहून यज्ञयागादि कृत्यांचें समर्थन केले. याच कुमारील भट्टाजवळ ब्राह्मणधर्म संस्थापक शंकराचार्य यानें अध्ययन केलें; व उत्तरमिमांसेचे समर्थन करून ब्राह्मणधर्मास पुष्टिकरण दिले. त्यानंतर शंकराचार्य हा हिंदुस्थान- च्या दक्षिण टोंकापासून तो उत्तरेस हिमालय पर्वतापर्यंत, व पश्चिमेस द्वारकेपासून तो पूर्वेस थेट समुद्रापर्यंत, उपदेश करीत फिरला, अनेक ठिकाणीं हिंदू धर्माचे मठ स्थापन केले; आणि बादरायणाने केलेल्या ब्रह्मसूत्रांत, बौद्ध व जैन या दोन्हीं धर्माची मतें खोडून काढून त्यानें हिंदू धर्माची जी सोपत्तिक उपपत्ति लाविली होती, त्याच ग्रंथावर शंकराचार्यानें भाप्य लिहून हिंदुस्थानांतील बौद्ध धर्माचे वर्चस्व नष्ट करण्याचे कार्य शेवटास नेले. तथापि हिंदू धर्माप्रमाणेच जैन धर्मही बौद्धधर्मास एक अत्यंत जबरदस्त प्रतिस्पर्धी म्हणून उत्पन्न झाला, आणि त्या धर्माचेंही बौद्ध धर्माबरोबर मोठ्या जोराचे व चिकाटीचे झगडे होऊन हिंदू- स्थानांतील बौद्ध धर्माच्या वृद्धीवर त्याचाही अतीशय अनिष्ट परिणाम झाला.