Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८१ )

आलेला आहे. या देशांतील मूळ लोक कोण होते, व ते कोठून आले, या बद्दल अजून निश्चित असा शोध लागलेला नाहीं. तथापि हिंदुस्थानचे मूळचे लोक अनार्य हे असून त्यानंतर द्रवीड लोक पहिल्यानें हिंदुस्थानच्या वायव्य व ईशान्य दिशेनें या देशांत आले, व त्यानंतर चीन देशांतून पिवळट रंगाचे मंगोलियन व त्यानंतर आर्य लोक हिंदुस्थानांत आले, असे उपलब्ध माहिती वरून निदर्शनास येत आहे; या आर्य लोकांचे मूळ वस्तिस्थान आशिया मायनरमध्यें, मध्य आशियांत कास्पियन समुद्राच्या आसपास अथवा काकेशस पर्वतानजीक होतें, असा आज- पर्यंतचा समज होता; व डॉक्टर मोल्टन याच्या मदाप्रमाणे हे मूळ बस्तिस्थान डान्यूब नदीच्या उत्तर दिशेस होतें; परंतु, उत्तर ध्रुवा जवळील आर्टिक प्रदे- शांत किंवा युरोप खंडाच्या उत्तर भागांत आर्य लोकांचे मूळ वस्तिस्थान होतें, असें ही अलीकडे एक नवीन मत निघालेले आहे; कारण त्या ठिकाणीं वर्षांतील सहा महिने रात्र व सहा महिने दिवस असतो; म्हणून तैत्तिरीय ब्राह्मणांत ( ३ - ९ - २२ ) “एकंवा एतद्देवानामहः । यत्संवत्सरः ॥ ( म्हणजे संवत्सर हा देवांचा एक दिवस आहे) असा उल्लेख आहे, तो याच गोष्टीस अनुलक्षून केला असावा असे दिसते; त्याप्रमाणेच संवत्सर म्हणजे देवांचा अहोरात्र एक दिवस अर्से वेदोत्तर कालीन ज्योतिषांतही दिग्दर्शन केलेले आहे; त्या वरूनही वरील तर्कास पुष्टी येते; शिवाय आर्य लोक एकत्र असल्या वेळी हीम, हिवाळा, वसंत काळ, या अर्थाचे जे शब्द होते, ते पौर्वात्य व पाश्चिमात्य भाषांत एक आहेत; परंतु उन्हाळा व हेमंत यांना तसे एक शब्द नाहींत; या वरूनही आर्याचे मूळ वस्तिस्थान युरोपखंडाच्या उत्तर भागांत असावे, असे स्पष्ट होते. त्याप्रमाणेच व्याघ्र, सिंह, या पशूंनां आर्य लोक एकत्र होते, त्या वेळचे शटु नाहींत, या वरूनही ही गोष्ट सिद्ध होते; शिवाय मूळचे आर्यलोक हे पुष्कळ गुरें, ढोरें बाळगून रहात असल्यामुळे त्यांना चांगल्या व मुबलक चान्यांची कुरणें, व आपल्या सार- ख्याच जोमदार, धिप्पाड, व गौरवर्णाच्या लोकांची उत्तम वाढ होण्यास भरपूर हवा व मोकळी मैदाने यांची अत्यावश्यकता होती; अशी जागा, म्हणजे रशियातील उरल पर्वताचे दक्षिणेपासून जर्मनीचे उत्तर भागापर्यंतचा प्रदेश ही असून तेंच आयचे मूळ वस्तीस्थान असावें, असें अनुमान आहे; व पूर्वीच्या लोकांच्या सांपडलेल्या डोक्यांच्या कवच्या वरूनही या अनुमानास पुष्टी मिळत आहे;