Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १८० )

वाने माहीत होण्यास संधी न मिळाल्यामुळे, पुढें वेळ निघून गेल्यावर माहीत होऊनही त्यापासून त्यांना कांहींही फायदा करून घेता आला नाहीं.
 वरील एकंदर विवेचना वरून आर्यलोक हिंदुस्थानांत आल्यावर त्यांची कसकसीं स्थित्यंतरें होत गेली, त्यांनीं केवढालीं साम्राज्य स्थापन केलीं, कशा प्रकारची राज्यपद्धत्ति घडवून काढिली वगैरे संबंधी आणि निरनिराळे धर्म, प्रसिद्ध व विद्वान मंडळ, व योद्धे, निरनिराळे वांग्मय विषयकग्रंथ, व अशाच प्रकार-- च्या इतर अनेक उपयुक्त बाबतीं, या संबर्धी हिंदुस्थानच्या पूर्व इतिहासाची बरोच माहिती होण्यासारखी आहे; तथापि हिंदुस्थान देशा संबंधी याहून ही थोडीशी अधिक अशी विविध माहिती त्रोटक रीतीनें या ठिकाणी ग्रंथित करणे आवश्यक आहे. अलीकडील शोधा वरून असे कळतें कीं, हिंदुस्थान देशाचा अनादकाला पूर्वीचा आकार हल्लींहून भिन्न होता; त्यावेळी हिंदुस्थान देश, आफ्रिका खंड, व आस्त्रेलिया बेट यांच्या मध्ये पाणी नसून जमीन होती, व हा सर्व प्रदेश एकमेकांस चिकटलेला होता. परंतु कालांतरानें मधील जमीन समुद्राखाली बुडून जाऊन हिंदुस्थान देश ह्या देशांपासून अलग होऊन ते द्विपकल्प बनले. हे हिंदुस्थानचे द्विपकल्प जगाच्या इतिहासात अत्यंत महत्वाचे गणले गेलेले असून या देशाचा अती प्राचीन काळा पासून इजिप्त, बाची लोन, चीन, जावा, ग्रीस, इताली, अरबस्थान, वगैरे देशांशीं व्यापारी संबंध चालत


 सर आलफ्रेड लायल याचेही असेच मत असून तो म्हणतो कीं, "आणी बाणीचे प्रसग पुढें येऊन पडल्यामुळे या प्रतिस्पर्ध्या पैकीं (म्हणजे आपले महत्व स्थापन करण्याकरितां, स्वतंत्र होण्याकरितां, अथवा प्रांत काबीज करण्याकरितां युद्धकलह करणाऱ्या प्रतिस्पर्ध्या पैकीं) कोणालाही, दूरवरचा विचार करण्याला, अगर आपापसात तडजोड करण्याला, व सशस्त्र युरोपियन सैन्य मध्ये मदतीस बोलाविल्या पासून घडून येणाऱ्या अपरिहार्य परिणामाकडे लक्ष पोंचविण्याला सवड मिळाली नाहीं.
 "None of these rivels could afford to look for ahead or concern themselves, in the face of emergent neods, with the inevitable consequences of calling in the arm d European.

British Dominion in Indai.

Page.90