Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६)

मुसलमानांचे राजकीय वर्चस्व त्याची परमावधी व अपकर्ष त्याच्या हिंदुस्थाना वरील अनेक स्वाया; त्यांच्यांतील अनेक नामांकित मंडळी, वगैरे संबंधी माहिती; पान २५९-६०; मुसलमान व सराटे यांच्या राजकीय उत्कर्षामधील वैशिष्य खलीफांच्या हातीं राजसत्ता, व धर्मसत्ता असल्यामुळे खलीफा व शंकराचार्य यांच्या अधिकारामधील फरकाचे विवेचन व खलीफत संबंधी त्रोटक माहिती; पान २६०-६२; मुसलमानी राज्यांतील हिंदूचे महत्व व त्या संबंधी उदाहणासह विवेचन; पान २६२-६५: मेकाले याने "लार्ड क्लाईन्छ " या निबंधांत मोंगल बादशाहीच्या वैभवाचे केलेले वर्णन व त्याचा गोषवारा; पान २६५-६६; अल्लाउद्दीन खिलजी यांच्या राज्य व सैन्य व्यवस्थेचे तुलनात्मक विवेचन; पान २६६-६७; हिंदुस्थान व इतर देशांची राजकीय तुलना हिंदु- लोकांचं कर्तृत्व, मराठयांच्या उत्कर्षाचा पूर्व रंग, शिवाजीचा जन्म वगैरे बाबतींतील हकीकत; पान २६८-७०; शिवाजीने केलेली मराठी राज्याची स्थापना; पुढील काळांत मराठा सरदार मंडळानी त्याचा केलेला अकल्पनातित उत्कर्ष; त्या साम्राज्यावर ओढवलेली अनेक संकटे, व त्यांतून निभावून मराठा साम्राज्याचा कांहीं काळ झालेला जयजयकार; पान २७०-७२.