Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७९ )

कपणे अनुभवास आल्यावांचून राहिला नाहीं. मुसलमान सत्ताधाऱ्यांकडून आप णास उपद्रव होऊनये, आणि वेळेवर आपला बचाब होऊन आपणास एक आश्रय स्थान व्हावे, म्हणून श्रीरंगरायाने इंग्रज कंपनीस मद्रास शहराची जागा दिली, आणि इतर सत्ताधाऱ्यांपैकी एका दोघांनी अशाच प्रकारची फ्रेंच कंपनीस इतर मदत केली; परंतु स्वतःचे महत्व प्रस्थापित करण्याकरितां, अथवा इतर कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगांतून निभावून जाण्याकरितां, श्रीरंगराया प्रमाणेच इतर परस्पर प्रतिस्पर्धी सत्ताधाऱ्यांपैकी कोणालाही दूरवरचा विचार कर `ण्याची, आपसांतच चालू भांडणे मिटविण्याची-अथवा आपल्या प्रतिस्पर्ध्यास चिरडण्यांकरितां इंग्रज अथवा फ्रेंच या परकीय युरोपियन सत्ताधान्यांची मदत घेतल्या पासून भावी अपरिहार्य परिणाम काय होतील याजबद्दल विचार कर ण्याची, व अशा रितीनें युरोपियन सत्ता बलिष्ट होऊन त्यांमुळे त्यांच्याच आाधीन कदाचित आपणासही व्हावे लागेल या राजधोरणाचे निरिक्षण करण्याची एकालाही बुद्धि झाली नाहीं; कोणाच्याही नुसतें विचार करण्याचे सुद्धां मनांत आले नाहीं, अथवा तसे कदाचित एखाद्याच्या मनांत आले अस ल्यास त्यास विचार करण्यासही फारसा वेळ मिळाला नाहीं; हिंदुस्थानच्या सरहद्दीवर गुरखे लोकांचें नेपाळचे एक स्वतंत्र राज्य आहे. या ठिकाण हल्लींही इंग्रजांचा रेसिडट राहतो; पण त्यास तेथील अंतर्गत राज्यकारभारांत हात घालिता येत नाहीं; नेपाळ हे स्वतंत्र राज्य म्हणून गणले गेलेले आहे. हें राज्य कोणत्याही देशांतील युरोपियन लोकांस आपल्या देशांत व्यापार करण्याची • मुळींच परवानगी देत नाही, आणि त्या संबंध त्यांच्यामध्ये एक म्हण असून दिचा अर्थ असा आहे कीं, " व्यापाराच्या मागून बंदूक व बायबलच्या मागून संगीन येते. " असाच प्रकार हिंदुस्थानात इंग्रज-फ्रेंच कंपन्या व्यापाराकरिता आल्यावर घडून आला; पण नेपाळांत ही म्हण इतरांच्या अनुभवावरून बसविली असल्यामुळे, आणि हिंदुस्थानांतील हिंदू-मुसलमान राजेरजवाड्यांना ती अनु-


 * "With the merchant comes the musket, and with the Bible comes the bayonet."

History of Nepal

By D. Wright-