Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७८ )

पापवासना ! आणि पापाचरण !! असे राजकर्ते आपल्या प्रजेस कितपत सुख देणार आणि त्यांचे प्रांतिक व स्थानिक अधिकारी तरी रयतेची कितपत काळजी बाळगणार, हे उघड दिसतेंच आहे; मग अशा स्थितीत राज्यकर्ते तरी प्रजेस कितीं प्रीय होणार व त्यांच्याबद्दल प्रजाजन प्रेम आदर व अभिमान कितपत बाळगणार हे ही तितकेंच उघड दिसतेंच आहे. आपले जीवित, अब्रू, व संपत्ति, सुरक्षित नाही, अशा राज्याला मग तें हिंदू राज्य असले तरी हिंदू प्रजा कोटपर्यंत कवट ळून घरील? आसपासच मुसलमानी राज्ये म्हणजे मूर्तिमत न्यायाचा अवतार होती, असे म्हणणे नाहीं; पण तीं या विजयानगरच्या राज्या हून पुष्कट पटीनें बरी म्हणविली जाण्या सारखी होतीं, यांत मात्र संदेश नाहीं. कारण मुसलमान राज्यें, धार्मिक बाबत आग्रही असली आणि त्यामुळे प्रजेस काहीवेळा अतीशय त्रास ही भोगावा लागला असला तरी सुद्धां त्यांना राज्यकर्त्याच्या कर्तव्याची, विजयनगरकरांच्या मानानें, अधिक जाणीव होती, व आपल्या प्रजेच्या सुख समृद्धि करिता ते अधिक काळजी घेत होते; अधिक दोस्त ठेवित होते; आणि हिंदू लोकांमध्ये आपण परके आहोत, हे त्यांना माहित असल्यानें थोडया फार प्रमाणानें तरी ते हिंदू प्रजेच्या इच्छेला मान देऊन वागत होते. त्यांनी राज्यांतील मुली व बंदोवस्त या संबंधी व्यवस्थित पद्धती आंखुन काढिशी होती, आणि अन्याय व जोरजुलूम यांनाहीं विविक्षित मर्यादे या आंतच ते ठेवित होते. विजापूर, गोवळकोंडे व अहंमदनगर येथील राज्यपद्धति, व तेथील राज्यकर्त्यांनी प्रजेच्या सुखसमृद्धि करितां केलेल्या अनेक गोष्टी यांची विजयानगरकरच्या इतिहासातील या बाब तींच्या गोष्टींशीं तुलना केली असतां विजयानगरच्या मानानें तीं राज्य अधीक सुव्यवस्थित व प्रजादच होतीं, असेच म्हणणे भाग पडते.
 त्याप्रमाणे व दुसन्याही एका महत्वाच्या गोष्टीचा या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करणे आवश्यक आदे; ती गोट ही की, हिंदुस्थानात, त्या देशाच्या पूर्व कालीन इतिहास आवासोतील युद्धांत अथवा भांडणांत विन्दातांची मदत घेण्याची प्रवृत्ति विशेष दिसून येते; आणि एकजात, एक समाज, अथवा एक गण ही भावना फारशी दृग्गोचर होत नाहीं. व या देशांत पुढील काळांत इंग्रज- व फ्रेंच कंपन्यापारा करितां आल्यानंतर तर या भावनेचा पूर्ण आभाव ठळ