Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७७ )

निझामाचे आश्रित आहेत; त्या प्रमाणेच, हलों या घराण्यापैकी पंचायतीराय व कुमार राव असे दोन राजपुत्र हयात असल्या बद्दलची हकीकत अनेगुंदी अथवा अनागोंदा येथील राजानें आपणास कळविल्याचे सिवेल यानें आपल्या इतिहासांत नमूद केले आहे.
 विजयानगरच्या अत्यंत संपत्तिमान व वैभवसंपन्न राज्याचा वर लिहिल्या प्रमाणे इतिहास आहे. अनियंत्रित व अव्यवस्थित राज्यकारभार, अप्रतिहत सूत्रचालकत्व, प्रजेच्या सुख समृद्धि विपय पूर्ण फेफिकीरी, ऐषाराम व मुखोपभोग यांची बेसुमार लालसा, नालायक राज्यकर्त्यांच्या परंपरेमुळे वाढव गेलेला उन्माद, सोन्याचांदीच्या निपार्नी, आणि हिरेरत्नांच्या दगडी आयुधांन कोणतीही व कशीही आपत्ति, संकटें, व परशत्रू पासूनचे उपसर्ग, सद्दज नाहों से करून टाकितां येतील, आणि याच आयुवानी कोणतीही अनीतिक कृत्ये करून त सहज पचवितां येतील ही कोत्या बुद्धिमुळे उत्पन्न होणारी घमंड, स्वतःच्या बलाचा फाजील गर्व, खोटा व बेसुमार अहंकार, अयोग्य ताठा, अन्यायो, व उपमर्दकारक वर्तन, आणि परमावधीची अनीति या सर्व कारणामुळे ते राज्य कमकुवत होत होत अग्वेरीस नामशेष होऊन गेले ! मुसलमानी राज्यकर्यांनी आपसांत जूट करून ते राज्य नामशेष केले, हें वरवर दिसणारें कारण आहे, आणि मुसल मानांनीं अशो जूट केल्यामुळेच ते नामशेष झाले, अशी समजूत होगे ही वरवर विचार केल्याचेच द्योतक आहे. परंतु वास्तवीक म्हणावयाचे म्हणजे, हे विजया नगरकर राजमंडळाच्या क्रियेमुळे कारण घडलेले आहे. हे राज्य नामशेष होण्याचा मुख्य दोष तेथील पुढील सर्व राज्यकर्त्यांवरच आहे. त्यांचाच आचार, विचार, व वागणूक, यांचा हा परिणाम आहे. मुसलमानांचा अंमल पतकरला, पण या अत्यंत अनीतिपूर्ण हिंदू राजाच्या जुलमी अमलाखाली राहणे नका, असें हिंदू प्रजेसच बांहूं लागावें याचा दोष विजयानगरकर राज्यकर्त्यांवर आहे. सोनाराची मुलगी निहाल ही खुषीन मुसलमानी गोषांत जाण्याला तयार होते, पण तिला विजयानगरकर हिंदू राजा नकोसा वाटतो, व त्याला टाळण्या करितां ती पळून जाते हा दोष कोणाचा ? विजयानगरकरांचाच हा दोष आहे. असे का व्हावें? हिंदू राजा विपयों त्याच्याच हिंदू प्रजेत अत्यंत असंतोष व वेदली का उत्सन्न व्हावी ? याचे कारण दुमन्यांच्या सुंदर व तरूण मुली संबंधी
 १२