Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७६ )

पट्टण- हे नांव द्यावें असें कबूल करून घेऊन त्यानें ती जागा-इंग्रजांस दिली. परंतु कोणत्याही देशाला तेथील अराजक स्थितिचे परिणाम कितीं खडतरपणानें भोगावे लागतात, याचें है एक उदाहरण आहे; तसेच हेंच इंग्रज बळावल्यावर श्रीरंगरायाचा हेतू व इंग्रजांची चंद्रगिरीच्या या राजघराण्यासंबंधाची पुढील कृति यांतील विशेष यांचें ही तें एक ठळक उदाहरण आहे. श्रीरंगराया नंतर दुसन्या तिरूमल रायाच्या कारकीर्दीत म्हैसूरकर हैदरअल्ली याने चंद्रगिरीचा प्रदेश आपल्या ताब्यात घेतला; परंतू तिरूमल रायानें त्याच्याशीं युद्ध करून तो परत मिळविला; तथापि त्यानंतर "म्हैसूरकरांचे आश्रित" म्हणून हे घराणे राज्य करीत होते. पुढे इ० सन १७९९ मध्ये टिपू सुलताना बरोबर अखेरचें युद्ध होऊन त्यांत तो मारला गेल्यावर त्याच्या कांहीं राज्या बरोबरच तिरूमल याच्या तात्र्यांतील चंद्रगिरीचा प्रदेशही इंग्रज व त्यांचे दोस्त निझाम या उभयतांनीं बांटून घेतला आणि तिरूमल रायास दरमहा पंधराशे रुपयांची नेमणूक करून देण्यांत आली; तथापि या वेळीं निझामाने आपणाकडे आलेल्या प्रदेशां पैकी अनागोंदी शहर व त्याच्या आसपासचा थोडामा प्रदेश तिरूमल रायाकडेस जहागिरी दाखल ठेविला; वास्तवीक म्हणावयाचे म्हणजे तिरूमल रायाच्या पूर्वजांचे उपकार स्मरून इंग्रजांनीं ह्रीं रायास आपल्या वाटणीत आलेल्या प्रदेशा पैकीं थोडासा प्रदेश-चंद्रगिरीचं छोटेसें संस्थान त्यांना कायम ठेवावयाचें नन्हते तरी, जहागिरी दाखल दिला असतां तर त्यांत इंग्रजांचे म्हणजे फार मोठेसे नुकसान होत होते. अथवा झाले असते, अशांतला काही भाग नव्हता;. उलट इंग्रजांच्या मनाचा उदारपणा व मोठेपणाच त्यामुळे दिसून आला असता; पण परमारें टिपूसाहेबाच्या प्रदेशाच्या वांटणींत, चंद्रगिरीकगचाही मुलूख वांटून वेऊन इंग्रजांना निझामा इतका मुद्धां आपल्या मनाचा उदारपणा व मोठेपणा दाखविण्याची बुद्धि झाली नाहीं, हे चंद्रगिरीकरांचे दुर्देव, अथवा इंग्रजांच्या स्वार्थी स्वभावाचे द्योतक होप, असेच म्हणणे प्राप्त होते.
 तिरूमलरायाचा मुलगा रामराय हा इ० सन १८२९ मध्ये अल्पवयीं असतानाच मृत्यू पावडा, तेव्हा त्याची जहागीर व नेमणूक बंद करण्यात आली. या घराण्यापैकीं श्रीरंगदेवराय ( पंपापतिराय ) आणि कुमारराघव असे दोन तिरूमल रायाचे वंशज अनागोंदी येथे रहात असून त्यांच्या जवळ आपल्या घराण्याचे कागदपत्र व वंशावळी अ ितत्वांत आहेत; भामि ते हलो हैद्राबादकर