Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७५ )

मल यांस अशा रीतीनें मुसलमान लोकांकडून त्रास होऊ लागला, तेव्हा त्यास कंटाळून तो मद्रासच्या नैऋत्य दिशेस असलेल्या चंद्रगिरी या नांवाच्या गांवों · गेला; व तेथे एक लहानसे राज्य स्थापन करून तो कालक्रमणा करूं लागला. ( इ. सन १५९४ ) त्या नंतर त्याचा वंशज श्रीरंग रायल-यास श्रीरंग- राय, सहावा रंगराय, अथवा श्रीरंगराय नाईक, असे ही न्हणतात; - याच्या पासून इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी तर्फे फ्रान्सिस डे यानें पूर्व किनाऱ्या- वरील हल्लीच्या मद्रास शहरची जागा विकत मिळविण्याचा प्रयत्न केला; कारण यावेळी इंग्रज कंपनीची स्थिति बरीच अडचणीची व कष्टप्रद झालेली होती. पूर्व किनान्यावरील आमगांव व मच्छलीपट्टण या दोन्ही ठिकाणी डच 'लोकांचा व्यापार मोठ्या जोरांत चालत असून त्यांच्यापुढे इंग्लिश व्यापाराचा टिकाव लागत नव्हता. शिवाय मच्छलीपट्टण है बंदर कुत्लशहाच्या अमलाखाली असून तेथे त्याचा अंमल जोरांत असल्यामुळे इंग्लिशांचा कोणताही इलाज चालेसा नव्हता; त्याप्रमाणेच इकडे सुरत येथेही प्रत्यक्षपणे मोंगल बादशहाचा अंमल असून तिकडेदी त्यांचे महत्व स्थापन होण्याचा संभव नव्हता; अशा स्थितींत इंग्लिशांनां एक तटबंदोच्या व आश्रयाच्या अशा स्वत:च्या मालकीच्या स्थानाची अतिशय आवश्यकता होती, आणि चंद्रगिरीकर नाईकाच्या ताब्यांतील इल्लींच्या मद्रास शहराची जागा, आपणास मिळाल्यास, ती, आश्रयास व आपल्या व्यापारास सोयस्कर व फायदेशीर असून, मच्छलीपट्टणपेक्षां शेकडा चाळीस टक्केपर्यंत स्वस्त माल त्या ठिकाण मिळेल अशी फ्रान्सिस डे याची खात्री झाली होती. म्हणून त्यानें श्रीरंगरायाकडून ही जागा विकत घेण्याची खटपट सुरू केली, व त्यास भेटून ती त्याने त्यांच्या कडून विकत मिळवून तेथे तटबंदी करण्याची ही परवानगी मिळविली. या वेळों इंग्लिशांची जशी सर्व साधारणतः संकटप्रदं स्थिती झालेली होती, त्या प्रमाणेच श्रीरंगरायाचीही निराश्रित स्थिति झालेली होती. त्यामुळे इंजाना आपल्या मुलांत तहबंदीचे ठिकाण बांधण्यास जागानयः परवानगी दिली असता त्यांचा आपणास उपयोग होत राहील, व वेळेवर त्यांभ्याकडून अप मंचाव व संरक्षण ही होईल, अशी हेतूने त्याने इंग्रजांच्या व्यापारी कंप ईस्ट इंडिया कंपनीस घरात आणिली आणि आपला बाप: चेनपा. याच राहण्याकरिता यावा जाणाऱ्या शहरांस चेनापट्टण -अथवा मा