Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७४ )

व्यंकटाद्रि ही त्याप्रमाणंच शहरांतून पळून जाऊन त्याने युद्ध व भावी अनर्थ थांबविण्याविषयीं या मुसलमान राज्यकर्त्यांना विनंति केली; परंतु त्याचा कांहीही उपयोग न होतां उलट त्यासही मुसलमानांनी पकडून ठार मारिल; अशा रीतीनें या तींन्हीं ही बंधूंची वासालत लागली, आणि सर्व शहर सर्वस्वी मुसलमानांच्या आधीन होऊन तेथील प्रजाजनांची "नाधनी नात्राता " अशी भगत स्थिति होऊन गेली !
 त्या नंतर मुसलमानांच्या ह्या विजयी सैन्याने एक दिवस विश्रांती घेतल्या वर विजयानगर शहरात प्रवेश केला व तेथे अनेक अनन्वित प्रकार केले. - सतत पांच महिने पर्यंत त्यांनी या दुर्देवी शहराची सारखी लूट केली; अनेक कत्तली केल्या: मोट मोठ्या इमारती, व देवळे यांचा विध्वंस उडविला, आणि जे विजयानगर शहर अत्यंत संपत्तिमान, वैभवसंपन्न, व गजबजलेले, म्हणून गणल गेलें होतें, तेंच आतां निर्धन, गतवैभवी, व भयाण होऊन गेल ! या युद्धांत मुसलमानांनी अगणित छूट मिळविली; सर्व देशाची धूळधाणी उडविली; नाना. प्रकारचे दम व अत्याचार केले आणि दिल्ली येथील तैमूरलंगाच्या प्रळया- प्रमाणे, जगाच्या इतिहासांत क्वचितच घडलेल्या उदाहरणाप्रमाणे, भयंकर प्रळय करून मोडिला! त्या नंतर या चारी मुसलमान सत्तावान्यांनी विजयानगर- च्या या हिंदू राज्याची आपसात वाटण करून घेतली; व ते सर्व राजकुरास एकत्र होऊन आपआपल्या राज्यांत परत गेले.
 तथापि विजयानगरचे राज्य नामशेष करण्यापुरतीच ही मुसलमान राज्य कर्त्यांची जूट झालेली असून त्यानंतर पुढे लवकरच पुन्हां त्यांचे अपसात पूर्वी प्रमाणेच मतभेद व युद्ध कलह सुरू झाले; विजयानगरचा नाश झाल्या नंतर तीरुमल हा सदाशिवरायासह काही काळ पेनकोंडा येथे जाऊन राहिला; "त्या ठिकाणी त्यानें एक लहानसें राज्य स्थापन केलें; सदाशिवरायाचा खून 'करून तो स्वतंत्रपणे तेथे राज्य करू लागला, व गोवळकांडेकर महंमद कुली कुशहा यानेंही ते राज्य नामशेष करण्याची बरीच खटपट केली; (इ० सन ५५७२.) विजयानगरच्या राज्यांतील जे कित्येक सरदार व किल्लेदार आप- आपल्या डाण्यांत स्वतंत्रपणे कारभार चालवीत होते, त्या सर्वांना त्याने आपल्या नियंत्रणाखाली आणि, व तो सर्व प्रदेश आपल्या अमलाखाली घेतला; तिरू-