Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७३ )

व अनुभवी होते; त्यांनी या काळापर्यंत अनेक युद्ध प्रसंग पाहिलेले होते; राम- रायाचें सैन्यही चांगल्या प्रकारचे असून त्या सैन्यानें मुसलमानी सैन्यास मदत केली होती, त्यांचा पराभव केला होता व त्यामुळे त्या सैन्यास मुसलमानी सैन्यासंबंधी माहिति व अनुभव होता. त्या प्रमाणेच या हिंदू सैन्यांत रामराय व त्याचे दोन बंधू एवढेंच फक्त तीन सेनानायक नसून इतर ही अनेक सेनानायक होते; पण रामरायाचा वध झाल्या बरोबर सर्व हिंदू सैन्याची एकदम धांदल उडाली; आणि या सैन्याची स्थीरस्थावर करून व त्यांस धीर देऊन पुन्हां युद्धभूमीवर सुसलमानार्शी दोन हात करण्याचे कार्य एकानेंही पुढारीपणा घेऊन केले नाहीं; तर जो तो आपला जीव जगविण्याकरितां समरभूमी सोडून पळाला. त्यामुळे विजयानगरच्या राज्याला व त्या शहरांतील प्रजेला भयंकर परिणाम भोगावे लागले, व तें राज्य कायमचे नष्ट होऊन गेले. तथापि इतर कोणत्याही कारणापेक्षां विजयानगरच्या राजांनी मुख्यतः कृष्णदेवराय व त्याहून ही अधिक प्रमाणाने रामदेवराय यानीं, मुसलमानांच्या मनास दुःख होईल असें वर्तन केले; याच कारणामुळे मुसलमान लोक चिडीक गेले; गोवळकोंड येथील शत्रु राज्यच फक्त नव्हें तर स्नेही असलेले विजापूरचें राज्यही विजयानगरकरांचे शत्रू बनले; व याच कारणामुळे अखेरीस या राज्याचा दास व नाश झाला. *
 रामरायाच्या बधा नंतर मुसलमानांचा प्रतिकार करण्यास कोणी ही तयार न होता जो तो स्वतःचा जीव जगविण्य, करित वांट सांपडेल तिकडे घाबरून पळाल्यावर मुसलमानांना मोकळे रान मिळाले. या भयंकर अपजयाची बातमी शहरात येउन धडकल्या बरोबर इतर प्रजाजना प्रमाणेच राजकुटुंबातील मंडळी ही आपणा बरोबर जडजवाहिराने भरलेले साडेपाचशे हत्ती घेऊन दक्षि- व पळाली; तिरूमल, सदाशिवरायास बरोबर घेऊन पेनकोंडा येथे पळून गेला;


 *Ths Rajs of Vijayanagar sent back a reply ao indecent in expression as to be uufic to relate, rays Firishtah. This behaviour on the part of the Hindus so incensed the follwers if Islam, not only the hostile subjects of Gos. kunda, but even tho allied troops and inhshitauts of the Bijapur territories, that it laid the founlation of the final downfall and distruction of Vijayanagar.

A Forgatter. Empore.

( By Robert SewBillyc