Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७० )

कृष्णा नदीच्या उतारावर अडविण्याकरितां त्याने आपला भाऊ तिरुमल-तिरु- मल्ल व व्यंकटाद्री यांनी रामराया विरुद्ध केलेले बंड त्याने दाबून टाकल्या नंतर ते उभयता पुन्हा रामराया जवळ पूर्वीप्रमाण अधिकार संपन्न स्थितींत होते; त्या उभयतां बंधू मधील तिरुमल्ल-यास एका मोठ्या सैन्यासह तेथें ठेविले; परंतु नुसलमानांनी त्यास फसवून ही उताराची जागा आपल्या ताब्यांत घेतली व त्या मार्गाने त्यांनी पुढें विजयानगरच्या राज्यात प्रवेश केला. तेव्हां त्यांच्याशीं तोंड देण्याकरितां रामराय हाही. आपल्या उभयतां बंधूसह आपणाबरोबर एक मोठे एक मोटें सैन्य घेऊन विजयानगरहून निघाला, व ता २३ जानेवारी इ. सन १५६५ रोजी तालीकोटच्या नैऋत्येस अजमारों तोस मैलांवर या उभयतां सैन्याचा समोरासमोर मुकाबला झाला. त्यावेळी उभय- तांचीही सैन्य शिस्तीनें व सुव्यवस्थेने उभी केलेली होतीं. मुसलमानी सैन्यांत उजव्या बाजूस अली अदिलशहा, डाव्या बाजूस अली बेरीदशहर व इब्राहीम- कुत्बशहा, आणि मध्यभार्गी हुसेन निजामशहा या प्रमाणे सैन्याची मांडणी. केलेली असून सर्व मुसलमानी सैन्यापुढे त्यांच्यापैकी निझामशहाचा तोफखाना सांखळींत बांधून उभा केलेला होता; या तोफखान्यांत अजमासे सहारों- तोफा असून, युरोपखंडांत तोफखान्यांसंबंधी काम शिकून त्यांत निष्णात झालेला जलीबी रुमोखा या नांवाचा आशियामायनर मधील एक मुसलमान मनुष्य त्यावरील मुख्य अंमलदार होता. रामरायाच्या सैन्यांतही तोफ- खाना असून हिंदूच्या फौजेंत उजव्या बाजूस व्यंकटाद्रि, डाव्या बाजूस तिरुमल्ल, व मध्यमार्गी स्वतः रामराय, असे उभे होते; युद्ध सुरू झाल्यावर रामराय पालखीत बसून आपल्या सैन्यास मोठ्या उत्साहाने उत्तेजन देत होता; आणि पहिल्यानें हिंदूंची सरशी होऊन मुसलमानांची पुष्कळच धांदल उडाली होती; परंतु तितक्यांतच रामराय हा पालखींतून उतरून बुद्धभूमीतच एका रत्नजडित आसनावर बसला व विजयी होऊन येणाऱ्या आपल्या सैन्यास चांदी सोन्याचे तोडे व रत्ने माणके वगैरे बक्षीस देण्या करितां त्यांचा आपणा समोर ढीग रचून युद्ध कौतुक पहात राहिला; हिंदू सैन्याची सरशी होऊन आपल्या सैन्याची धांदल उडाली, असें पाहतांच, हुसेन निजामशहाने न डगमगतां मोठ्या तडकीनें हिंदू सैन्याची मध्यफळी फोडिली, व तो थेट रामरायावर चाल करून आला. तेव्हां जिवाच्या भीतीनें रामराय तसाच लगबगीनें पालखीत बसला, व