Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६९ )

तेव्हां अशा बलाढ्य व संपत्तिमान राज्याचा पाडाव करणे, ही गोष्ट कोणत्याही एकट्याच मुसलमान राजास शक्य नसून सर्व मुसलमान राज्यकर्त्यांनी मिळून एक चित्तानें संगनमत केले तरच कायती, शक्य व साध्य आहे." त्यानंतर अदिल शहाच्या आज्ञेनें किशवरखानाने अशी आपसांत जूट घडवून आणण्याचा उद्योग आरंभिला. गोवळकोंडेकरास रामराया कडून नेहमी उपद्रव होत असल्या - मुळे तो या कटात सामील होण्यास लागलाच तयार झाला व त्याने नगरकर हुसेन निजामशहासदी आपल्या पक्षांत सामील करून घेण्याची कामगिरी पत्करून त्यांत यश मिळविलें व बेदरकर अली बेरीदशहा याचेही मन वळवून त्यास त्यांनी आपल्या कटांत ओतून घेतले. तथापि बहामनी राज्या मधून उत्पन्न झालेल्या या शाखांतील कांहीं मध्ये आपसात नेहमीं वैरभाव चालत आला होता त्या -मुळे ही जूट उद्दिष्टकार्य सिद्धीस जाईपर्यंत टिकेल की नाहीं, याबद्दल परस्परांच्या मनोमयीं शका होती पण त्या बरोबरच विजयानगरचें राज्य नामशेष करणे, ही गोष्टी सर्वासच होती; त्यामुळे पूर्व वैर विसरून सर्वांची मनें शुद्ध रहावी, म्हणून त्यांनी आपसांत संबंध जुळवून आणिला. हुसेन निजामशहा यानें आपली मुलगी प्रसिद्ध चांदबिबी ही अदिलशहास दिली व त्याबरोबर तिला सोलापूरचा किल्ला आदण दिला. उलट अदिलशहानें आपली बहीण हुसेन निजामशहाचा मुलगा सूर्भुजा यांस दिली; व अशा रीतीनें दोस्तीची जूट रुधिर- रज्जूंनी घट्ट केल्यावर या चौघांनी मिळून विजयानगरचे राज्य नष्ट करण्याच्या पूर्व तयारी करितां इ० सन १९६४ च्या अखेरीस विजापूर येथे आपआपल्या सैन्यासह तळ दिला. त्या नंतर रामराया विरुद्ध युद्ध सुरू करण्यांस कांही तरी कारण पाहिजे, म्हणून अल्ली अदिलशहा विजापूरकर याने आपले वकील राम- -शयाकडे पाठवून, आपल्या पूर्वी ताब्यांत असलेला तुंगभद्रा व कृष्णा या नद्यांच्या दुआबांतील मुद्गल व रायचूरचा प्रदेश, व बागलकोटचा प्रदेश, हे आपणास परत देण्याविषयीं जरी रामराय हा ते परत देणार नाहीं अशी त्यांची · खात्री होती तरी मागणी केली, आणि ती त्याने पूर्णपणे फॅटाळून देऊन त्या वकिलांना परत पाठविल्या नंतर या चौत्रांचे एकत्र झालेले सैन्य एकदम विजया- नगरवर चाल करून निघाले, रामरायास त्यांच्या या हालचालीची पूर्णपण माहिती होती, आणि या संन्याशी टक्कर देण्याची त्याने कडेकोट तयारी ही केली होती; त्या नंतर हे सैन्य विजयानगरच्या मुलखात शिरण्यापूर्वी त्यास