Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १७१ )

निजामग्रहोच्या तावडींतून निसटण्याचा प्रयत्न करू लागला. त्यावेळी निजाम- शहानें आपला एक मस्त हत्ती पालखीवर सोडिला; तेव्हा बावरून भोई लोक रामरायाची पालखी तेथेच टाकून पळून गेले; तथापि न डगमगतां तो एका घोड्यावर बसून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला; इतक्यांत निझामशहाच्या सैन्याने त्यास पकडून जंलीची रुमीखान याच्या हवाली केले. त्यानंतर त्याने रामरायाची निजामशहकडे रवानगी केली व त्याने लागलीच यांचे शोर कापून तें उंच भाल्यास टोचुन रणभूमीवर फिरविले; तेव्हा आपल्या धन्याची हो भयंकर स्थिति पाहून हिंदू सैन्याचा धीर खचला: ते दुखानें, निराशेनें व भया ने समर भूमी सोडून पळून गेले, आणि त्यामुळे मुसलमानास निर्विवादपणे हिंदूवर जय मिळाला.
 विजयानगरच्या विध्वंसाची पुढील हकीगत देण्यांपूर्वी युद्धातील या अनिष्ट परिणामा विषयीं या ठिकाणी थोडासा विचार करणे आवश्यक आहे. विजया- नगरचे राज्य सहाबलाढ्य असन नुसलमानांच्या वर्चस्वाला तें प्रतिबंधक व अपायकारक होतें; त्यामुळे त्यांनी या राज्याविरुद्ध जूट करून ते नामशेष कर- ण्याचा प्रयत्न करणें, केव्हाही त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने त्यांना इष्ट व आव- श्यक असंच होतें; शिवाय गमर(या सारख्या शूर व दूरदश पुरुषास मुसलमा नांची मनें उगाच न दुखविण्याचेंही घोरण रहावयास पाहिजे होतें. मुसल- मानांच्या मदतीस जाऊन उलट त्यांच्याच मशीदींचा विध्वंस करणें, आणि त्यांचा उपमर्द करणे, ही गोष्ट केव्हांही गैर व जाचक अशीच होती. या गोष्टी त्यानें टाळिल्या असत्या तर अपसांत परस्पर शत्रू असलेल्या या चार मुसलमान राज्यकर्त्याची इतक्या लवकर एकी झाली नसती; आणि कदाचित झाली असती तरी हिंदू विरुद्ध मुसलमान इतक्या अखेरीच्या परमावधी पर्यंत चिंडीस गेले नसते; त्या प्रमाणेच ही मुसलमानांची जंगी स्वारी आपणावर लवकरच येऊन कोसळणार, हें त्यास माहित असून ही त्याने आपल्या सामर्थ्याचा व शत्रूच्या एकवटलेल्या शक्तीचा योंग्य अंदाज बांधिला नाहीं. फाजील घमेड, गर्व, अहंकार, व ताठा, या पासून परावृत्त झाला नाहीं; अथवा या अरिष्टाचा प्रतिकार कर ण्याचे मूळपासूनच कसोशीचे प्रयत्न-मुसलमानांची आपसांतील जूट फोडण्या- करितां आवश्यक असलेल्या प्रयत्नापासूनचे पुढील प्रत्येक प्रयत्न कर