Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६८ )

खेल्या राज्यांमध्ये परस्पर सलोखा झाला. त्या नंतर रामरायाच्या तिरुमल व व्यंकटाद्रि या उभयतां बंधूनी रामराया विरुद्ध बंड उभारिलें, त्यावेळीं ऐन आणीबाणीच्या प्रसंगीं इब्राहीम कुल्ल्शहानंही तें मोडून काढण्यास रामरायास मदत केली होती. थोडक्यांत म्हणजे, रामराया विरुद्ध पुढें एकत्र झालेल्या चारी मुसलमान राज्यकर्त्यांच्या रामराय हा अनेक वेळीं अतीशय उपयोगी पडला होता; आणीबाणीच्या वेळीं त्यांच्या मदतीस धांवून गेला होता, व उलट पक्षी त्यास ही त्यांच्या कडून अशीच निरनिराळ्या प्रसंगीं अमोल्य मदत मिळालेली होती. अशा स्थितीत रामरायार्थी त्यांचे शत्रुत्व उत्पन्न झाले तरी त्याच्या बद्दल भयंकर द्वेष उत्पन्न होगें, व त्याचा व त्याबरोबरच विजयानगरच्या राज्याचा समूळ नाश करण्यापर्यंत त्यांचा निर्धार होणं यांस "शत्रुत्व" हेंच एकटे सर्व साधारण कारण लागू पडत नाहीं; तर रामरायानें मुसलमान लोकांचा सतत केलेला अपमान, त्यांनां चीड उत्पन्न होऊन त्याबद्दल त्यांच्या मनांत पूर्णपणे पीळ पडण्यासारखीं त्यानें केलेली कृत्यं, आणि त्यांच्याशीं चालू ठेविलेली तुच्छतादर्शक वागणूक हेच प्रधान कारण त्यास लागू पडते, असें म्हणजे प्रात होतें.
 रामरायाचे वर्तन दिससे दिवस अनियंत्रित, उद्दाम व आगळिकीचें होत चाललें, असें पाहून विजापूरकर अदिलशहा याने त्यास व विजयानगरच्या राज्यास नामशेष करण्याकरितां मुसलमान राजेरजवाड्यांची आपसांत जूट घडवून आणण्याचे आपला वजीर किशरवान याच्या अनुमतीनें ठरविले व भर दरबारांत आपल्या सर्व सरदर मंडळीस उद्देशून त्यानें असें भाषण केलें कीं, " अलीकडे विजयानगरकर हिंदू राज्यकर्ता उन्मत्त होऊन आपला हरवडी अप- मान करीत आहे, तरी सर्वांनी मिळून त्याचा नाश करणे आवश्यक आहे. या काम यश आल्यास आपला एक जबरदस्त शत्रू कायमचा नष्ट होईल, आणि यश न येता धर्म संरक्षणा करितां मृत्यू आला तरी तें ही पुण्यप्रदच होईल. " त्यावर त्याचा वजीर किश्वरखान याने शहास असे स्पष्ट सांगि तलं की, " विजयानगरच्या राज्याचा अंमल तुंगभद्रा नदी पासून तो थेट रामेश्वरापर्यंत अबाधित असून हा सर्व प्रदेश मुसंपन्न आहे. तेथील राज्यकत्यांच्या ताच्यांत समुद्रकिनाऱ्या वरील अनेक बंदरे असून तेथें व्यापारची मोठ्या जारीनें सारखी घडामोड होत असते व या राज्याचा वसूल वीस कोटी येत असतो.