Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६७ )

शहा, अहंमदनगरकर हुसेन निजामशहा, व बेदरकर अली बेरीदशहा, हे चार मुसलमान राज्यकर्ते एक होऊन त्यांनी रामरायास व त्याबरोबरच विजयानगरच्या राज्यात अखेरीस नामशेष करून टाकण्याचा निश्चय करण्यापर्यंत प्रसंग येऊन धडकला होता.
 रामराया हा ज्याप्रमाणे विजापूरकर अदिलशहाच्या उपयोगी पडला होता, त्या प्रमाणेच गोवळकोंडेकर इब्राहीम कुलशहा याच्याही तो अतीशय उपयोगी पडला असून रामरायाच्या आधारावरच कित्येक काळपर्यंत तो गादीवर टिकून होता. त्यामुळे कुत्बशहावरही त्याचे उपकार झालेले होते. त्याप्रमाणेच नगरकर न्हाण निजामशहा यांसही त्याने विजापूरकरा विरुद्ध अनेक वेळा मदत केली होती, व बेदरकर अल्ली बेरीदशहा याच्यावरही त्याने अप्रत्यक्ष रित्या इतके उपकार केले होते की, त्याच्या मध्यस्ती मुळेच ते राज्य एक वेळां नाम- शेष होण्यापासून बचावले होते. इब्राहीम कुशहा यांस गमरायाचा विशेष आधार होता. त्यावेळीं त्यानें निजामशहाशी सख्य करून बेदरचें राज्य - म्हणजे वेदरशाही बुडविण्याचा घाट घातला होता; परंतु ही हकीकत रामरायास कळल्यावर त्याने इब्राहीम कुल्ल्शहा यांस एक पत्र पाठवून त्यास असे कळविलें कीं, "विजापूर, व नगर, येथील राज्यकर्ते आपसांत एक- मेकांशी लढत असून ते उभयतांसही परस्परांना इतके तुल्य बल असल्याचें हत्तीस आले आहे की, अशा रीतीनें युद्ध चालू असतां त्या पासून आज- पर्यंत एकाचाही फायदा झालेला नाहीं. तथापि मी आतां असें ऐकतों को तुमचे वडील तटस्थ रहात असतां, तुम्ही मात्र विजापूरकराविरुद्ध निजामशहास मदत करण्यास तयार आहांत; परंतु इब्राहीम अदिलशहाचे व माझे सख्य असून त्याने तुमची कोणत्याही प्रकारें आगळीक केलेली नाहीं; शिवाय तुमचे व माझें ही पुष्कळ दिवसांपासूनचे सख्य आहे; म्हणून मी आपणास अशी विनंती करितों कीं, अशा रीतीनें परराज्यापहरण करण्यासाठी आपण जे हैं कारस्थान उभारिलें आहे, तें बंद करावें, आणि आपले सैन्य परत बोलावून घेऊन उभय पक्षाशी ही सारखाच सलोखा ठेवावा म्हणजे त्यांच्यामध्ये ही आपसांत संख्य होऊन या फार दिवस चाललेल्या युद्धाची समाप्ती होईल.” रामरायाचे अशा आश- या इब्राहीम कुत्बशहा यांस पत्र मिळाल्यावर त्याने विजयानगर येथे जाऊन रामरायाची भेट घेतली, व त्याच्याच मध्यस्थीने या अपसांत युद्ध करीत अम-