Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६६ )

खालील असूल ते अहंमदनगरकर हुसेन निजामशहा यानें आगळीक करून आपल्या ताब्यांत घेतले त्यावेळी अदिलशहानें विजयानगरच्या रामरायाची मदत घेऊन निजामशाही प्रदेशावर स्वारी केली, ( इ० सन १५५८ ) आणि त्याचा सर्व प्रदेश उध्वस्त करून टाकिला. तेव्हां निजाम शहाने हे दोन्ही किल्ले त्यास परत देऊन त्याच्याशी तह केला. परंतु या स्वारीत रामरायाच्या सैन्यानें अतीशय अनीतिचे व क्रूरपणाचे आचरण केले; अनेक घरें जाळिलीं; व मोठ मोठ्या इमारती आणि मशीदीही फोडून त्यांचा विध्वंम उडविला. त्या प्रमाणेंच पुढील वर्षीही त्याने पुन्हां अदिलशहा- यांस निजामशहा विरुद्ध मदत केली, व गोवळकोंडेकर, विजापूरकर व विजया नगरकर हे तीघेही थेट अहंमदनगरवर चाल करून जाऊन त्यांनी निजामशहा यांस तह करणें भाग पाडले. पण यावेळी तर रामरायाच्या सैन्याने पहिल्याहून ही अधिक अनर्थ व अनन्वित प्रकार केले; त्यामुळे मदतीच्या मेहेरबानी बद्दल मिळणारा नयदा नाहींसा होऊन उलट मुसलमानांना चीड उत्पन्न झाली, व पुढें तालीकोटचा भयंकर प्रसंग उद्भवला. शिवाय तो गविष्ट असून त्याने यावेळी मुसलमान लोकांस अतीशय वाईट रीतीने वागविले; आपल्या दरबारी असलेल्या मुसलमान राजेरजवाड्यांच्या वकिलांनांही तो अतीशय उपमर्दकारक रीतीनें वागवू लागला, आणि मुसलमान सत्ताधाऱ्यांनां तुच्छ समजून विजयानगरच्या सरहद्दीवर असलेल्या अदिलशाही व कुत्बूशादी राज्यास तो अतीशय उपद्रव देऊ लागला. आधीच कृष्णदेव यानें अदिल शहाचा अपमान केल्यामुळे तो मनांत त्याच्याविषयीं अतीशय जळत होता; त्याच्या मदतीस रामराय भाल्यावेळीं त्याचें उद्दाम, गर्विष्ट, व अपमान- कारक वर्तन एकंदर मुसलमान सैन्यास दुःसह होऊन त्यामुळे त्यांची कृष्णदेव- रायाविरुद्ध अपमानाचा सूड घेण्याची ईच्छा प्रदिप्त झाली होती; मुसलमान राज्यकर्त्यांच्या वकिलांनी आपल्या भयंकर अपमानाबद्दल रामराया विरुद्ध आप- आपल्या दरबारी सारख्या तक्रारी नेल्यामुळे या सुडाच्या इच्छेत जीवनशक्ति उत्पन्न झाली होती, आणि विजापूर व गोवळकोंडे, या उभयताही राज्याविरुद्ध त्याने सारखे अतिक्रमण केल्यामुळे, उत्पन्न झालेल्या जीवनशक्तित, नंतर जुटीच्या बळाचा जन्म होऊन विजापूरकर अदिलशहा, गोवळकोंडेकर कुल्