Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६५ )

कृष्णदेवरायाचा शूर व कर्तृत्ववान प्रधान आणि सेनापति तिम्मराज हो सर्व -सत्ताधीश बनला, व अच्युतराय हा निव्वळ नांवाचा राजा म्हणूनच कायतो गादीवर राहिला. तथापि अच्युतराय गादीवर आल्या नंतर लवकरच तिम्मराज ` हा मृत्यू पावला, व त्याचा वडील मुलगा रामराय हा आपले दोन बंधू तिरू- मल्ल व त्र्यंकटाद्रि यांच्या मदतीने राज्यकारभार पाहूं लागला; त्यावेळीं अच्युत रायाने रामराया विरुद्ध इब्राहीम अदिलशहा याची मदत मागितली; त्याप्रमाणे शहा विजयानगर येथे गेला; परंतु रामरायानें त्यास पुष्कळ संपत्ति देऊन संतुष्ट करून हे संकट टाळले. (इ० सन १५३६) तथापि विजयानगरचे राज्य बुड़- 'विण्याविषयीं विजापूरकराची प्रबळ इच्छा अजूनही कायम होती; कृष्ण देवानें अदिलशहाचा केलेला भयंकर अपमान तो विसरला नव्हता, आणि तो व त्याचा बजीर आसदखान हे उभयतां विजयानगरचें राज्य बुडविण्याची मोठ्या जारीने • खटपट करीत होते; अशाच स्थितींत इ० सन १५४२ मध्ये अच्युतराय मृत्यू पावला, तेव्हां त्याचा पुतण्या सदाशिवराय यांस रामरायाने, आपल्या उभयतां बंधूंच्या अनुमतीनें गादीवर स्थापन करून, स्वतः राज्यकारभार चालविण्यास -सुरवात केली.
 तथापि या वेळी रामराय हाच वास्तविक रित्या विजयानगरच्या : राज्याचा कुल मुखत्यार असून सदाशिवराय हा जवळ जवळ बंदिवाना च्याच स्थितीत ठेवण्यांत आला होता. औपचारिक रित्या राज्यकारभार - सदाशिवरायाच्या नावाने चालविला जात असे; आणि दर वर्षांतून एक दिवस रामराय हा आपल्या उभयतां बंधूसह त्याच्याकडे जाऊन त्यास सन्मान दर्शक - मुजरा करीत असे. रामराय हा शूर व कर्तृत्ववान असून तो राज्यकारभार पाहूं लागल्या वेळेपासून त्याने या राज्याची पुष्कळच भरभराट केली; आसपासच्या 'प्रदेशावर स्वाऱ्या करून आपल्या राज्याचा विस्तार केला, आणि बहामनी राज्या पासून उत्पन्न झालेल्या राज्यांत आपसांत चालू असलेल्या वैमनस्या मुळे त्यास आपला फायदा करून घेण्याची योग्य संधी ही मिळाली; शिवाय त्याने मापले सैन्य वाढवून राज्यास बळकटीही आणिली व खुद्द अदिलशहासही दोन वेळा त्याची मदत घ्यावी लागली; त्यांचे कारण असे घडून आलें कीं, -कल्याणी व सोलापूर हे दोन किल्ले विजापूरकर अदिलशहाच्या अमला