Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६४ )

त्याप्रमाणेच हंपी येथील देवालयासमोर त्यानं दोन भव्य मनोरे उभारिले, ते हल्लींही अस्तित्वात आहेत. शिवाय तो विद्वानांचाही मोठा भोक्ता असून प्रसिद्ध विद्वान अप्पय्या दिक्षीत हा त्याच्या पदरीं होता. बहामनी राज्य नष्ट झाल्यावर कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांच्या दुआबांत असलेले रायचूर व मुगल हे परगणे विजापुरकराकडे भाले; आणि विजापुर व विजयानगर या उभयंतां राज्यांचे शत्रुत्व असल्यामुळें व या प्रदेशाबद्दल या वेळेपर्यंत हिंदु व मुसलमान : राज्यकर्त्यांमध्ये नेहमी वाद उपस्थित होत असल्यामुळे, त्याने इ. सन १५२० च्या मे महिन्यांत तुंगभद्रा नदी उतरून रायचूरवर स्वारी केली; अदिलशहाशीं भोठ्या निकराने युद्ध करून त्याचा पूर्ण पराजय केला व हा प्रदेश आपल्या ताब्यांत घेतला; परंतु त्या नंतरचे त्याचे वर्तन अयोग्य घडले. या विजयामुळे त्यास अहंकार उत्पन्न झाला. स्वतःच्या कर्तृत्वास फाजील महत्व देऊन त्याने मुसलमानांची मनें दुखावतील असे वर्तन केले; अदिलशहाचा अतीशय अपमान केला; स्वत:च्या सामर्थ्याबद्दल खोटा अभिमान त्यास उत्पन्न होऊन तो मुसल - - मानांना तुच्छ लेखन, वर आणखी, निर्धास्त राहूं लागला; परंतु कृष्ण देवाच्या उद्दाम वर्तनामुळे सर्व मुसलमानी सत्ताधारी त्याचा व विजयानगरच्या राज्याचा पाडाव करण्याकरितां आपसांत एकी करण्याचा प्रयत्न करू लागले; आणि उन्माद व गर्व यांच्या अतिरेकानें अंध झालेल्या कृष्णदेवास भावी भयंकर अरिष्टाचें भान न राहून अखेरीस विजयानगरचं राज्य नष्ट होण्याचा खडतर प्रसंग ओढवला !
 विजयानगरच्या घराण्यांतील हा यशश्वी राजा कृष्णदेव इ० सन १५३०० मध्ये मृत्यू पावला, आणि त्याचा भाऊ अच्युतराय हा गादीवर आला. याच्या कारकीर्दीपासून या राज्यास पुन्हा उतरतो कळा लागली; कारण तो नालायक व मित्रा असून स्वभावानेही अतीशय दुष्ट होता; त्यामुळें त्याच्या राज्यांतच त्यास • अनेक शत्रू उत्पन्न झाले. तो राज्यावर आल्यावर लवकरच अदिलशहानें, कृष्ण देवाने ६० सन १५२० मध्ये मोठ्या कष्टाने मिळविलेले- रायचूर व मुद्रल हे - महत्ाचे परगणे त्याच्या ताब्यांतून हिसकावून घेतले, आणि त्याबद्दल त्याचा प्रतिकार करणें तर बाजूच राहिले, परंतु स्वतःच्या दुष्ट आचरणामुळे उत्सन्न झालेल्या राज्यांतील शत्रूंचा नाश करण्या करिता त्यास उलट त्याच आदिक . शहाची मदत घ्यावी लागली. असा हा दुर्बल राज्यकर्ता गादीवर आल्यामुळे