Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६३ )

-मानांच्या एकसारख्या होणाऱ्या स्वान्यांनां बराच आळा घातिला, आणि वेदरकर कासीम बेरींद यांस विजापूरकर यूमुफ् आदिलशाहाच्या विरुद्ध मदत करून कृष्णा व तुंगभद्र या नद्यांच्या दुआबांत असलेलीं रायचूर व मुद्रल हीं शहरें आपल्या हस्तगत करून घेतली. (इ. सन १४९३ ) नरसिंहरायाच्या मागून वीर नरसिंहराय व त्या नंतर कृष्णदेवराय हा गादीवर आला; ( इ. सन १५०९) हा मोठा कर्तृत्ववान, उदार, व शूर, असून त्यानें आपल्या कारकीर्दीत सर्व दक्षिण हिंदु- स्थान आपल्या अमलाखालीं आणिलें होतें, आणि साधारणतः दक्षिणेस तुंगभद्रा नदीपासून तो कन्याकुमारी पर्यंत, आणि पूर्व पश्चिम समुद्रा पासून कारोमांडल किनाऱ्या पर्यंतच्या प्रदेशांवर तो राज्य करीत होता, व याच राज्यांमध्यें तेलंगण, पांडय, व चोल, वगैरे उपराज्यांचा समावेश होत असून ते राजे त्यास करभार देत होते; त्याच्या पदरीं रंग राय तिम्मा उर्फ तिम्मराज या नांवाचा एक हुषार प्रधान व सेनानायक असून त्याने विजापूरकराबरोबर युद्ध प्रसंग करण्यांत कृष्ण देवास नेहमीं अमोलिक मदत केली होती; व स्वत:ही अदिलशहाशी पुष्कळ लढाया मारून विजयानगरच्या राज्याचा विस्तार व त्याची भरभराट करण्यांत त्यानें कृष्ण देवराव प्रमाणेच प्रमुखत्वाने भाग घेतला होता; शिवाय त्याचे व कृष्ण देवरायाचे अगदी जवळचं नातेंही होतें. या तिम्मरायास रामराय, तिरू मल व व्यंकटाद्रि असे तीन मुलगे होते. त्यापैकीं वडील रामराय यांस कृष्ण- देवाची वडील मुलगी तिरूमल्लम्मा ही दिली होती; व दुसरा मुलगा तिरूमल यांस त्याची दुसरी मुलगी दिली होती: त्यामुळे या राज्याच्या उत्कर्षाकरिता तिम्म राजाने विशेष परिश्रम घेतले होते. कृष्णदेवराय हा मोठा धार्मिक व प्रजावत्सल राजा असुन त्यानें हंपी येथे इ. सन १५१३ मध्ये कृष्णस्वामीचे मंदीर बांधिलें, व त्या मंदिराजवळ पुढे इ. सन १५२८ मध्ये श्री नृसिंहाचा एक प्रचंड दगडी पुतळा उभारिला. हा पुतळा एकाच सबंद दगडाचा कोरि- लेला असून तो अजमासे २५ फूट उंच व १७ फूट बंद आहे. हा पुतळा लही अस्तित्वात आहे, परंतु त्याचे हात वगैरे काहीं अवयवांचा पुढें ताली- कोटच्या युद्धानंतर भंग झालेला आहे. याची राणी नागलादेवी हिच्या स्मर- गार्थ त्याने विजयानगर शहरांतच नागापूर या नांवाचा एक नवीन भाग स्वतविला विजयानगर येथे एक विस्तृत तलाव बांधला, आणि ठिकठिकाणीं मोठाले कालवे बांधून त्याने आपल्या राज्यांतील शेतीस उर्जितावस्था आणिली.