Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६२ )

व विरूपाक्ष व नंतर मल्लिकार्जुनाचे मुलगे राजशेखर व विरूपाक्ष दुसरा • अनुक्रमें, गादीवर आले. मध्यंतरीं महंमदशहा दुसरा याच्या कारकीर्दीत (इ. स. १४६३ ते इ. स. १४८२ पर्यंत ) विजयानगरच्या ताब्यांतील गोंवें हैं महत्वाचे बंदर त्याचा प्रसिद्ध वजीर व सेनापति महंमद गवान याने इ. सन १४७१ मध्ये हस्तगत करून घेतलें, तथापि तें ठिकाण कोकण पट्टीतील एक महत्वाच नाक म्हणून असल्याने ते परत मिळविण्याचा, विजया मगरकरांचा स्नेही, वेळ- गावचा राजा वीर कर्णराय यार्ने प्रयत्न केला परंतु त्यांत त्यास अपयश येऊन राज्यभ्रष्ट होण्यापर्यंत त्याजवर प्रसंग ओढवला व ते शहर अखेरीस बहामनी राज्याकडेच राहिले 'इ. सन १४४४ नंतर विजयानगरच्या राज्यांस उतरतो कळा लागली, व कोकण पट्टीतील चोल व दाभोळ हेदी प्रांत बहामनी राज्याने आपल्या हस्तगत करून घेतले. दुसरा विरूपाक्षराय हा दुर्बल व दुर्वर्तनी असून याच्या कारकीदीत दरबारांत तंटेबखेडे उत्पन्न झाले, आणि त्यांत विरूपाक्षराय व त्याचा मुलगा हे उभयताही मारले जाऊन नरसिंहराय सालय- हा साल्व अथवा चात्ववंशी असल्यामुळे त्यास सालव हैं जोडनांव मिळाले- या नावाच्या दुसऱ्या एका कुटुंबांतील सरदाराने, इतर दरबारी मंडळींच्या भद- ती, हें राज्यपद बळकाविल (इ. सन १४९०) हा नरसिंहराय मोठा कर्तृत्य- वान व पराक्रमी असून तो गादीवर देण्यापूर्वी विजयानगरच्या राज्याचा महा- मंडलेश्वर अथवा मुख्य सेनापति होता, व त्यास "महाराय” असा किताब होता; त्या वेळेपासूनच वास्तवीक रित्या तो या राज्याचा मुखत्यारीने कारभार पहात होता, विजयानगर येथील दुर्बल राज्य कर्त्यास त्याने आपल्या हातांतील निव्वळ बाहुले करून ठेविले होते; इ. सन १५२६ मध्ये बहामनी राज्याचा रॉटचा शहा अल्लोमउल्ला हा अहंमदनगर येथील बुम्हाण निजामशहाकडे येऊन राहिल्या- वर बहामनी राज्य नष्ट झाले; तरी वास्तवीक रित्या विजयनगरच्या राजघराण्याचा पहिला वंश न झाला, त्याच सुमारास इ. सन १४९० च्या सुमारास बहामनी राज्याचे तुकडे पडण्यास वे अपमात युद्ध कलह सुरू होण्यास प्रारंभ झाला, आणि बहामनी राज्या ऐवजी विजापूरचे आदिलशाही राज्य विजयानगरच्या राज्यास, दुसरा जबरदस्त म्हणून उत्पन्न झालें.
 नरसिंहराव हा गादीवर आल्यावर त्याने विजयानगरच्या राज्यावर मुगल-