Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६१ )

बहामनी राज्याचा पाडाव करण्याकरितां त्यानें नेहमी प्रयत्न चालू ठेविके होते; इतकेच नाहीं तर, पूर्वी प्रमाणें, बहामनी राज्यास खंडणी पाठाण्याचे ही त्याने बंद केलें होतें. मध्यंतरी इ० सन १४३५ मध्ये अहंमदशहा मृत्यू पावला, व त्याचा मुलगा अल्लाउद्दीन हा गादीवर भाला. तेव्हां त्यानें देवरायावर खंडणी मिळविण्या करिता स्वारी केली व ती त्याच्याकडून वसूल करून तो परत गेला. देवरायानें अल्लाउद्दीनशहास यावेळों मुबलक खंडणी दिली खरी, परंतु अशा भीतीनें शहाचे तावेदार होऊन राहणें देव- रायास पसंत नव्हते; म्हणून त्यानें बहामनी राज्याचा पाडाव करण्या करितां सैन्य भरती करण्यास सुरवात केली; मुसलमान लोकांसही तो आपल्या नौकरींत दाखल करूं लागला, व थोडक्याच काळांत त्याने बरेच मोठें मुसलमानी सैन्य आपल्या नौकरीत दाखल करून घेतलें, त्यांना संतुष्ट ठेवण्या करितां त्यानें विजया नगर येथे भर वस्तीत एक मशीद बांधिली, व हिंदू राजास मुजरा करणे अशास्त्र वाटून त्यामुळे या मुसलमानी सैन्याच मर्ने दुखावली जाऊं नये म्हणून आपल्या सिंहासना समोर एका उंच आसनावर तो कुराणाचे पुस्तक ठेवू लागला; त्यामुळे देवरायाचा ही मान राहून मुसलमानी सैन्य कुराणासच मुजरा करीत असते, असा प्रकार बाह्यात्कारी दिसून येऊ लागला. अशा रीतीनें आपल्या सैन्याची योग्य सिद्धता केल्यावर तो या सैन्यासह मोठया झपाट्याने निघून त्यानें तुभद्रानदी ओलांडली, व बहामनी राज्याच्या सरहद्दीवरील मुद्रलच्या किल्ल्यास वेढा देऊन आसपासचा प्रदेश उध्वस्त करण्यास प्रारंभ केला. अल्लाउद्दीनशहास ही बातमी कळल्यावर तोही आपल्या सैन्यासह मोठया झपाट्यानें मुद्गल येथे त्याच्या- वर चाल करून आला, व उभयतांमध्ये तीन निकरांच्या लढाया होऊन त्या सर्वात ही शाहाच विजयी झाल्यामुळे देवरायास, त्याला पुष्कळ खंडणी द्यावी लागून पूर्णपणे माघार घ्यावी लागली. (इ. सन १४४३ ) त्यानंतर पुढील वर्षी दुसरा देवराय मृत्यु पावला, व तिमरा देवराय हा गादीवर आला. या पहिल्या वंशाने इ. सन १४९० पर्यंत राज्य केलें. परंतु दुसन्या देवराया नंतरची फारशी माहिती उपलब्ध नाही.
 तिसरा देवराय गार्दीवर आल्यानंतर त्यानं फक्त पांच वर्षे इ. सन १४४४ ते इ. मन १४४९ पर्यंत राज्य केले. त्या नंतर त्याचे मुळगे मल्लिकार्जुन
 ११