Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६० )

परक्याच्या निद्दाल या मुलीच्या अभिलाघानें त्यास स्वतःची मुलगी ही मुसलमा- नांच्या घरांत घालावी लागली, त्या मुलीचें ही लग्न फिरोजशाहाचा मुलगा हसन- खान यांजबरोबर झाले; आणि आपल्या मुली शिवाय बंकापूरचा किल्ला व पुष्कळशी संपत्ती शहास देऊन या मानहानीच्या मरण प्राय सौधावर देवरायास फिरोजशहा जवळून आपला जीव विकत ब्यावा लागला ! (१४०७ )
 त्यानंतर पांचच वर्षांनों इ. सन १४१२ मध्यें - देवराय हा मृत्यू पावला, व त्याचा मुलगा वीर विजय हा गादीवर आला. त्याची सात वर्षांची कारकीर्द बरीच शांततेची असून त्या अवधीत बहामनी राज्याबरोबरील युद्ध कलह तापुरते बंद पडले होते. वीर विजय हा इ. सन १४१९ मध्ये मृत्यू पावला, व त्याचा वडील मुलगा देवराव दुसरा हा गादीवर आला; देवराय गादीवर आल्या- वर तीनच वर्षानंतर म्हणजे इ. सन १४२२ मध्ये, फिरोजशहा मृत्यू पावला; आणि आपत्या मृत्यू पूर्वी दहा दिवस त्यानें आपण स्वतः गादीवर बसविलेला त्याचा धाकटा मुलगा खानखानान हा अहंमदशहा हे नाव धारण करून राज्य करू लागला. याच्या कारकीर्दीत दुसऱ्या देवरायानें केरळ प्रांताच्या राज्यकर्त्याची मदत घेऊन त्याच्याबरोबर युद्ध आरंभिले; परंतु तें चालू असतां मुसलमानानी केलेल्या एका हल्ल्यांत देवराय हा स्वतःच अहंमदशहाच्या हातों सांपडला होता; परंतु तो कसाबसा त्याच्या तावडीतून निसटून पळाला. तथापि याच वेळी या युद्धाचा परिणाम कळून आला. अहंमदशहानें विजयानगरच्या राज्यांत शिरून त्या राज्याची अतीशय धूळधाण उडविली, आणि त्याचा प्रतिकार कर ण्याचे देवरायाने केलेले प्रत्येक प्रयत्न त्याने पूर्णपर्णे हाणून पाडले; त्या मुळे देवरायाचा नाइलाज होऊन त्याने अहंमदशहाशी तह केला, व पूर्वी प्रमाणे त्यास मुबलक खंडणी देऊन त्यानें वांटेस लाविलें त्या नंतर देवराय हा पुढ़ें शहास नियमितपणे खंडणी पाठवीत राहिला, त्या मुळे उभयतां मध्ये अहंमदशहा जिवंत होता तो पर्यंत सख्य राहिलें होतें. दुसरा देवराव हा बराज शूर, कर्तृत्ववान व मानी असून त्याच्या कारकीर्दीत विजयनगरच्या राज्याची अतीशय भरभराट झाली. त्याने आपला प्रवान नागण्णा उर्फ धननायक याच्या मदतीने पुष्कळच चांगल्या रीतीनें राज्यकारभार चालविला. त्यस मानापमानाची विशेष चाड होती, आणि