Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५९ )

 अशा रीतिने, वर लिहिल्या प्रमाणे, देवरायानें आपल्या राज्यांतील मुद्गल या गांवावर हल्ला करून आगळीक केल्यामुळे फिरोजशहास अतिशय राग आला, आणि देवरायास या कृत्याबद्दल योग्य शासन करण्याकरितां तो विजयानगरावर चाल करून आला; परंतु रामरायांत आपण स्वतः एकटेच त्याचा पराभव करूं, अशी हिंमत नव्हती; याक्ती नव्हती; व साधनेही नव्हतीं. आजपर्यंतच्या शाहाबरो वरील प्रत्येक युद्धांत लामोपाठ अपजय आला असून शहा सांगेल त्या अटींवर अपमानास्पद रीतीनें त्यास तह करावा लागला होता; आणि आताही तसाच प्रसंग ओढवणार, अशी त्यास खात्री असल्याने, त्याने गुजराथ, माळवा, व खान- देश, येथील मुसलमान राज्यकर्त्यांना आपल्या मदतीस येण्याविषयी पाचारण केले होतें; आणि त्यांतल्या त्यांत गुजराथ व माळवा प्रांताचे राज्यकर्ते, आपणास मदत करतील, अशी त्यास विशेष आशा होती. कारण तैमूरलंग यानें दिल्लीवर स्वारी केली त्यावेळी फिरोजशहा याने आपला वकील दिल्ली येथे त्याच्याकडे पाठवून त्याचे सार्वभौमत्व मान्य केले होते; व उलट तैमूरलंगानेही प्रसन्न होऊन फिरोजशहाकडे त्याच्या वकीला बरोबर परत नजराणे पाठवून त्याचा सन्मान केला होता; त्यामुळे किरोजशहा विषयों गुजराथ व माळवा प्रांताच्या राज्यकर्त्यां च्या मनात वैषम्य उत्पन्न होऊन त्यांनीं फिरोजशहा विरुद्ध देवरायाशी सख्य करून 'एका कारस्थान उभारिलें होतें, व त्यानंतर ही मुगलची भानगड | उप्तन्न झाली होती. तेव्हां अशा स्थितीत फिरोजशहा विरुद्ध आपले दोस्त बनलेले हे दोन्हीं राज्यकर्ते आपणास मदत करतील, अशी त्यास खात्री वाटत होती. व म्हणूनच त्याने त्या उभयतांना आपल्या मदतीस येण्याविषयों विनंती केली होती; परंतु या पैकी कोणीही त्याच्या मदतीस आला नाहीं; व एकच्या देवरायासच फिरोज- शहाच्या भारी सैन्याबरोबर युद्ध करणे भाग पडले; या युद्धांत कांहीं काळपर्यंत त्याने टिकाव धरिला, परंतु अखेरीस फिरोजशहाने त्याचा इतका पिच्छा पुरविला की विजयानगरच्या राज्यालाच मुकण्याचा त्याच्यावर प्रसंग येऊन गुदरला; आणि अतां फिरोजशहा बरोबर तो सांगेल त्या कोणत्याही अप- मानास्पद अवर तह करण्यास कबूल होण्याशिवाय आपणास जीव जग- विण्यास दुसरे कोणतेही गत्यंतर राहिलें नाहीं, अशी त्याची खात्री झाली; तेव्हां स्याने आपली मुलगी शहास देऊन त्याच्याशी तह केला ! देवरायाच्या झा मुलीचे जिशाहा बरोबर मोठ्या थाटाने विजयानगर येथेंच लग्न झाले !! ज्या