Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५८ )

आपल्या राज्यांतील देवरायाच्या या आगळिकीमुळे फिरोजशहास राग येऊन तो मात्र चिडीस गेला. वास्तवीक पाहतां स्त्री विषयक निंद्य अनिति हीच मुळीं घातक, आणि त्यातही पुन्हां परराज्यांत आपला हाड वैरी, व ज्याच्या पुढे आपणास अनेक वेळां नम्र व्हावे लागले, त्या फिरोज शहाच्या राज्यांत असा प्रकार करणे तर अत्यंतच अत्यंत घातक; परंतु कामातुर मनुष्याल ज्या प्रमाणे भय अथवा लज्जा नसते, त्या प्रमाणेच सारासार विचार बुद्धी, व आपल्या कृतीचे भावी परिणाम यांची ही ओळख व अटकळही नसते; अणि खरोखर तशीच या नीतीभ्रष्ट, विवेक शून्य, व विकारवश झालेल्या देवरायाची ह्या वेळी स्थिती झाली. देवरायाचा हा खरखरमुंडा दिवसा ढवळ्या आपल्या राज्यांत चाल- लेल नंगा नाच उघड्या डोळ्यांनी पाहून स्वस्थ बसण्या इतका थंड्या मिजासाचा, आळणी स्वभावाचा, अथवा कर्तृत्वहीन आचरणाचा फिरोजशहा हा खास नव्हताच नव्हता; बहामनी राज्याचे, विजयानगरचे राज्य स्थापन झाल्या पासून, त्या राज्यार्थी सतत सारखे पैर चालत आलेले होते; आणि आपल्या या विजया- नगरच्या या दुष्मानाचा कोणताही डाव आणि तोही आपल्या राज्यांत या बहामनी राज घराण्यांतील कोणताही राज्यकर्ता केव्हांही साधूं देणार नाहीं, इत- केंच नव्हे, तर अशा प्रकारच्या प्रत्येक अगळिकी बद्दल पूर्णपणे सूड घेतल्या शिवाय ही राहणार नाहीं, हे नि:संशय ठरून चुकल्या सारखेच होतें; भ्रश्र्वासना, पापी शरीर, अनीतिच्या संवई मुळे भ्रष्ट झालेले मन, भग्न झालेली सारासार विवेक बुद्धी, व विचारशक्ती, अविवेकी व अन्याची कृती, यांचा मूर्तिमंत पुतळा असलेला हा देवराय - विजयानगरच्या डळमळीत राजनुगुटाचा हा घनी पुढें अत्यंत अधोगतींत गेला ! नेहमीं नेहमीं भ्रष्ट विचार, व पापी कृति यांतच त्यांच मग रममाण होत गेल्या मुळे त्यांचे काळीज कन्वें होऊन भित्र व लोभी बन मन तकलादी झाले; रणक्षेत्रात बटून मरण्यापेक्षा अपमानानें विलासांत मन राहण्याची त्यास गोडी लागली; विलासात मन राहण्याकरितां जगावें, अशी - त्याची स्वाभिमानशून्य प्रवृत्ति बनली व संबईच्या कोडगेपणामुळे मान हानीच दुःख विसरून उल्ट कधी काळीं तें बाहेर येईल, म्हणून त्याच्या भोवती विषयो / पभोगाचे जाड जाड थर तो देत राहिला आणि आपली मुलगी मुसलमानांच्या गोपांत गेली तरी चालेल, पण आपण जगावें, आणि तेही विलासांत मम राहण्या- करिता जगावें, इनका हीन, दीन व दुर्बळ प्रवृत्तीचा तो अखेरीस बनून गेला !!