Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५७ )

प्राय झाले होते; अनीतिच्या आचरणाच्या संवईने निरढावून गेल्यामुळे त्यांचा स्वाभिमान लोपून गेला होता आणि ही स्त्री विषयक आसक्ती पुढे पुढे तर इतक्या परमावधीच्या मर्यादेपर्यंत जाऊन पोहोंचली होती की, कोठेही विशेष सौंदर्य संपन्न व तरुण मुलगी आढळल्यास तिला तिच्या आई बापाच्या अथवा पालकाच्या संमतीनें राज्यकत्यांकडे पाठवावी, असे स्थानिक अधिकान्यांना त्यांच्याकडून हुकूम मिळत होते. अशा अनीतिपूर्ण कृत्यांचा परिणाम हा केव्हाही निःसंशय अत्यंत अनिष्ट असाच घडून आला पाहिजे, हे उघडच आहे; आणि अशा आचरणामुळे प्रजेचे मन राज्यकत्याविषयीं, कलुषित होणं, व अत्यंत उद्वेगानें, " असले हिंदू राज्य नष्ट झाले तरी पतकरले, " असें प्रजाज- नांना वाटणे स्वाभाविक आहे. शिवाय अशा स्त्री विषयक बाबतीमुळेंच राज्यात अनेक प्रकारच्या भानगडी उत्पन्न होऊन युद्ध प्रसंगही ओढवले होते; ही गोष्ट लक्षांत आणून, कोणत्याही साधारण अकलेच्या राज्यकर्त्यासही आपण अशा कृत्यांपासून कायमचं परावृत्त व्हावें, असा धडा घेता येण्याजोगा होता; परंतु देव(या सारख्यानेही या पैकी कोणतीही गोष्ट विचारांत घेता, आपला अनीतिचा क्रम तसाच पुढे चालू ठेविला; इतकेंच नव्हे तर परराज्यातील मुली- वरही पापवासना धरून, तिला जबरदस्तीने आपल्या जनानखान्यांत ओढ-, ज्याची त्या खटपट केली; परंतु तींत शेवटी त्याचीच फसगत होऊन त्याच्यावर अत्यंत अनिष्ट व अकल्पनातित असा घोर प्रसंग ओढवला !
 विजयानगरच्या सरहद्दीवर मुद्गल या नांवाचा एक गांव व किल्ला आहे. हे ठिकाण महंमदशहाच्या कारकीर्दीत पहिला बुक यानें हस्तगत करून घेऊन, कांहीं काळपर्यंत आपल्या ताब्यांत ठेविले होते; परंतु पुढे बहामनी राज्य- कत्यांनीं तें पुन्हां आपल्या ताब्यांत मिळवून घेतलें होतें; म्हणजे आता है ठिकाण विजयानगरच्या राज्याच्या अमलाखाली नसून बहामनी राज्याच्या अमलाखाली होते; या गांधी, निहाल या नांवाची एक अत्यंत लावण्यवति अशी सोनाराची मुलगी असल्याचे देवरायास कळले; त्यावेळीं त्यानें त्या मुलीच्या बापाकडे तिच्याविषयीं मागणी केली; परंतुत्या मूलीची इच्छा नसल्यामुळे तिच्या बापाने देवरायाची मागणी अमान्य केली. तेव्हां देवरायाने कोणत्याही प्रकार विचार न करिता त्या मुलीस पकडण्याकरितां तिकडे आपले सैन्य खाना केले; परंतु ती तेथून पळून गेल्यामुळे त्याच्या हातीं सांपडली नाहीं. उलट