Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५६ )

आल्यानंतर या आपल्या जन्मदात्या रामरायाला नामशेष केले ती भवितव्यता,- या गोष्टींच्या काळास आतांच कोठे नुकतीच सुरवात झाली होती; देवरायास तेजोहीन, व पौरुषहीन करून सोडणाऱ्या राजकीय रंगभूमीवरील भवितव्यतेचा 'पडदा आतांच कोठें नुकतीच उघडत जाण्यास सुरवात झाली होती; बलिष्टांच्या प्रतिस्पर्धेतील कमताकद ठरणाऱ्या राज्यकत्यांच्या मानसिक अधोगतीच्या परमाव- घीचे प्रत्यंतर आणणारी राजकीय ढगांतील अनीतिमूलक विद्युल्लता- जी पुढे • मोठ्या जोराने कडाडून रामरायाच्या डोक्यावर येऊन आदळली ती विषुल्लता- आतांच कोठें नुकतीच चमकण्यास सुरवात झाली होती; आणि, अनीतिच्या पापांचा पूर्ण घडा भरून, खवळलेल्या भरसमुद्रातील फुटून तुकडे होऊं पाहणाऱ्या निराश्रित जहाजाप्रमाणे, रामरायाचे नशिबाचे तारू दुर्वर्तनाच्या प्रखर खडकावर - अपटून त्याचे तुकडे होण्याच्या काळास आतांच कोठें नुकताच प्रारंभ झाला होता ! विजयानगरचे राज्य संपत्तिमान व बलाढ्य होते; परंतु त्यास लवमात्रही “नैतिक पाठबळ नव्हते; त्यामुळे, वरून तें कितोही भव्य व बळकट असं दिसत "असले तरी, त्याचा पाया मूळांतच अनीति मुळे डळमळीत झाला होता; त्यांतील 'पुढील बहुतेक सर्व राज्यकर्ते अनीतिमान, विपयीं, व स्त्री लंपट, असून त्यांना - न्यायनीतिची, अथवा जनलज्जेची ही चाड राहिली नव्हती. नैतिक अधः पातास कारणीभूत होणारे दुर्गुण, व पापी वासनांची जोपासना, यामुळे या • राज्यास आंतून कीड लागलेली असून, हा पोकळ डोलारा केव्हां धडाडून खालीं • येईल याचा नेम नव्हता. “राज्यकर्ता, ” या नात्यानें आपणावर केवढी जबाबदारी आहे, आपले आचार, विचार, व कृती, यावर आपल्या प्रजेचे किती मुखदुःख अवलंबून आहे, आणि आपल्या करणीचा परिणाम आपणास आपल्या प्रजेस, व एकंदर राज्यास, अखेरीस केवढा घातक होणार आहे, याची फारशी जाणीव ही या घराण्यातील राज्यकर्त्यांपैकी बहुतेकास नव्हती. संपत्ती, हेंच - सुखाचे साधन, ही भावना, संपत्ती, हाच कोणतेंही दुःख, संकट, व आपत्ति, यांचे निरसन करणारा तरतुदीचा तोडगा, ही समजूत, न्यायान्यायाची, अथवा · नीति- अनितिची कोणत्याही प्रकारें चाड न बाळगितां, संपत्तिच्या जोरावर सांध्य करण व पचन पाडणे शक्य असलेले प्रत्येक प्रकारचे विषयोपभोग, व विलास- ऐपाराम यांतच नेहमीं दंग राहणे, हेंच आपल्या जन्माचे इति कर्तव्य, अशी भ्रष्ट व आकुंचित बुद्धी, यामुळे, या राज घराण्यांतील पुरुषार्थाचे तेज गंजन नष्ट