Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५५ )

तेव्हां फिरोजशाहादी त्याच्या युद्ध करण्याकरिता तिकडे चाल करून गेला; व या उभयतांच्या सैन्याची कृष्णा नदीवर गांठ पडली; परंतु या वेळीं नदीस उतार नसल्यामुळे हीं उभयतांही सैन्य एकमेकांसमोर दोन कांठावर तळ देऊन राहिली; त्यावेळीं फिरोजशहाने देवरावाच्या सैन्यात कपटानें प्रवेश करून त्याचा नाश करण्याची मसलत केली, आणि देवराय व त्याचा मुलगा हे विषयी, व विलासी असल्याचे त्यास माहित असल्यामुळे, आणि काळ, वेळ, व प्रसंग, न ओळखतां ते त्यांत मग्न होतील, अशी त्याची साधारणतः खात्री असल्यामुळे त्यांनां विलासांतच मन करून नामशेष करावें, असें त्याने कारस्थान उभारिल. फिरोज हा स्वतः त्याच मालिकेतील असल्यामुळे त्याच्या बरोबर करमणुकीची निरनिराळीं साधनें जय्यत असणं स्वाभाविकच होतें; व तीं, तशीं होतीं ही; त्या पैकीं शिराज या नांवाच्या एका कसवी मनुष्यास त्याने एका कलावंतिणी बरोबर स्त्री वेष देऊन गुप्त रीतीनें कृष्णानदी पलीकडील देवरायाच्या छावणीत रवाना केलें, व तीं उभयतां तेथें सुरक्षित पोहोंचल्यावर त्यांनीं अगाऊ तजवीज करून राजपुत्रा समोर आपले गान - नृत्यादि कसब दाखविण्याची परवानगी मिळविली; नंतर रात्रीं सुरे जंबिये वगैरे प्राण घातक हत्यारे आपणा बरोबर लपवून घेऊन शिराज हा, त्या कलावंतिणीसह, स्त्री वेषांत राजपुत्राच्या डेऱ्यांत गेला, व तेथे त्याने तिच्यासह राजपुत्राच्या समोर नृत्य-गान करण्यास सुरवात केली. राज- पुत्रास आपणावरील प्राणहारक भावी दन्याची कोणत्याही प्रकारें नुसती शंका येण्यास सुद्धां कारण नव्हते; त्यामुळे तो या नृत्य गायनांत अगदीं तल्लिन होऊन गेला होता ही संधी साधून सिराज हा एकदम त्याच्यावर मोठ्या जोराने तुटून पडला, आणि त्यास भयंकर वार करून त्याने जागच्या जागींच ठार केले; त्या बरोबर विजयानगरकरांच्या सैन्यांत रात्रीतच भयंकर गोंधळ उडून ते सैन्य भीतिग्रस्त व नाउमेद झाले; अशा संधींत, दुसऱ्या दिवशीं सकाळीं फिरोजशहाने या सैन्यावर हल्ला केला, व त्याचा पूर्ण पराभव करून, विजयानगरपर्यंत पाठलाग करीत तो चाल करून गेला; तेव्हां अखेरीस देवरायाने फिरोजशहांशी नाइलाजानें तह केला, आणि मुबलक खंडणी भरून त्यानें शहास कसें बसें एकदाचे परत वांटस लाविलें.
 तथापि या उभयतां राज्यकर्त्यांमधील स्त्री विषयक भानगड, व त्यामुळें देवरायाने आपण होऊन जन्मास आणिलेली भवितव्यता - जिने स्वतः जन्मास