Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५४ )

त्यानें ही विजयानगरकर बुक्क राजा बरोबर सारखे युद्ध प्रसंग सुरू ठेविले; थेट विजयानगर शहरावर ही चाल करून येऊन त्याने बुक्कयांत आपणा बरोबर तह करण्यास भाग पाडले; आणि त्याच्या कडून पुष्कळ संपत्ती व प्रदेश मिळ- वून तो गुलबर्गा येथे परत गेला ( इ० सन १३७८.) त्या नंतर पुढील वर्षी ( इ० सन १३७९ मध्ये ) विजयानगरकर बुक्क हा मृत्यू पावला, व त्याची स्त्री गौरी हिच्या पोटीं झालेला मुलगा हरोहर ( दुसरा ) हा गादीवर बसला. त्यानें आपणास " महाराजाधिराज " ही पदवी धारण केली असून, प्रसिद्ध माधवा 'चार्याचा मुत्सद्दी व विद्वान बंधू सायण्णाचार्य, हा त्याचा मुख्य प्रधान होता. हरीहर हा शंकर भक्त असून त्यानं आपल्या कारकीर्दीत अनेक शिवालयें बांधिली व त्यांचा इतमान, पूजा अर्चा, वगैरेच्या खर्चाच्या बाबतींचाही योग्य बंदोबस्त करून दिला. हरीहर हा इ० सन १३९९ मध्ये, बीस वर्षे राज्य करून, मृत्यू पावला, व त्याचा मुलगा दुसरा बुक्का हा गादीवर आला. याची कारकीर्द फक्त सात वर्षाचीच असून ती ही विशेष महत्वाची नाहीं; दुसऱ्या बुक नंतर त्याचा भाऊ देवराय हा गादीवर आला. त्यावेळीं फिरोजशहा या नांवाचा राज्यकर्ता बहामनी गादीवर होता. त्या काळांतील या उभयतां ही राज्यकर्त्या संबंधी विशेष लक्षांत ठेवण्या सारखी गोष्ट ही आहे कीं, ते उभयतां ही नैतिक आचरणापासून परावृत्त झालेले व विषयी होते; फिरोजशाहा हा स्वतः मद्यप्राशन करीत होता; त्याचा जनानखाना अतीशय मोठा असून त्यांत निरनिराळ्या देशांतील स्त्रिया संग्रहित केलेल्या होत्या, व भीमा नदीच्या तीरीं फिरोजाबाद या नांवाचे एक शहर वसवून त्या ठिकाणीं त्यानें आपल्या या जनानखान्याकरितां-हल्ली अस्ति- त्यांत असलेला एक तटबंदी व विस्तीर्ण वाडा ही बांधिला होता. विजयानगरकर देवरा दाही तसाच विषय व विलासी होता; परंतु अशा अनीतिच्या समान शीलाच्या राज्यकर्त्या मध्ये पूर्वापार चालत आलेल्या प्रतिस्पर्धेत स्त्रीविषयक वातीची भर पडल्यास, तिचा मोठ्या जोरानं स्फोट झाल्याशिवाय, आणि त्यांतील दुर्बलावर त्याचा भयंकर आघात झाल्या शिवाय राहणार नाहीं, ही गोष्ट उबडच ठरल्या सारखी होती; आणि त्या प्रमाणेच त्याचे अखेरीस परिणाम घडून आहे; फिरोजशाहाच्या कारकीर्दीत देवरायाने शहाच्या ताब्यांतील राय- चूर दुआ प्रांत आपल्या दस्तगत करून घेण्याकरितां तिकडे स्वारी केली;