Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५३ )

ही राज्य एकाच काळात अनुक्रमें गुलबर्गा, व विजयानगर, येथे स्थापन होऊन पुढे या उभयतांत, परस्परांना नामशेष करण्या करिता, व स्वतः चे वर्चस्व निर्वेध करण्या करितां, मोठ्या निकराच्या युद्ध प्रसंगाचें सत्र चालू झालें.
 मध्यंतरीं, अल्लाउद्दीन हा मृत्यू पावला, व त्याचा मुलगा महंमदशहा हा गादीवर आला. (इ. सन १३५८ ) याच्या कारकीर्दीत बुक्क यानें तेलंग- 'णच्या राजाची मदत घेऊन, बहामनी राज्याच्या ताब्यात गेलेले आपले कैलास - वगैरे. प्रांत परत मिळविण्या करितां महंमदशहाशीं युद्ध सुरू केले; त्यांत तैलं- - गणचा राजपुत्र विनायकदेव हा बुक्क याचा सेनापती होता. महंमदशहाच्या कार - कीर्दीत कैलास प्रांतावर बहादूरखान या नांवाचा एक शूर सरदार सुभेदार म्हणून कारभार चालवित होता; त्यानं बुक याच्या हिंदू सन्या बरोबर निकराचे युद्ध करून त्याचा पूर्ण पराजय केला तथापि त्या नंतर हे युद्ध बंद न पडता तसेच पुढें - ही चालू राहिले; तेव्हा महंमदशहा हा स्वतः या सैन्यावर चाल करून आला, आणि त्यानं त्याच्याशी पुन्हां युद्ध करून बेलमकोंडा उर्फ वेलमपट्टण येथें विनायक देवाचा पाडाव करून त्याचा वध केला. तेव्हां बुक्क यानें दिल्ली येथील बादशहा फ़िरोजशहा याची मदत मागितली; परंतु तो राज्य विस्ताराच्या विरुद्ध मताचा असल्यामुळें त्यानें बुक्कास महंमदशहा विरुद्ध कोणत्याही प्रकारें मदत केली नाहीं; ही गोष्ट महंमदशहास, विशेष फायदेशीर व एक प्रकार चुक्क विरुद्ध उत्तेजन देणारी, अशीच घडून आली; आणि त्यानें तैलंगण प्रांतावर स्वारी करून तेथील राज्यकर्त्या कडून ३३ लक्ष रुपये खंडणी, व गोवळकोंडयाचा किल्ला, मिळविला, व विजयानगर येथील बुक्क राजा विरुद्ध मोहीम सुरू केली; तथापि बुक्क यानें कोणत्या ही प्रकारें न डग मगता शहाच्या सैन्या बरोबर मोठ्या निकराने टक्कर दिली, व मुद्गलचा किल्ला हस्तगत करून घेतला. त्या नंतर अश्वनी या नांवाच्या गांवाजवळ पुन्हा बुक्कचा सेनापती भोजमल याने शहा बरोबर लढाई दिली; परंतु तींत त्याचा पराभव होऊन तो जखमी झाला, व त्यास मुसलमानी सैन्या समोरून माघार घेणे भाग पडले. (इ० सन १३६६ ) आणि पुढेही या उभयतां राज्य- 'कर्त्यांमध्ये काही काळ पर्यंत युद्ध सुरू राहून, नंतर उभयतां मध्ये तह झाला. महंमदशहा, हा इ० सन १३७५ मध्ये मृत्यू पावला, आणि त्याचा मुलगा मुजाहिदशहा हा गादीवर आला; हा राज्यकर्ता मोटा शूर व धाडशी असून