Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५२ )

खानानें मार्गे राहिलेल्या मोंगली सैन्यावर मोठ्या जोराचा हल्ला करून त्याचा नाश केला, व बंदर आणि कंधारी हे किल्ले हस्तगत करून दक्षि णेची राजधानं. दौलताबाद या शहरावर तो चाल करून गेला. तेव्हा तेथील नुकताच सुलतान झालेला नासिरउद्दं न यान दक्षिण प्रांताचा कारभार स्व खुषीनें सोडून तो जाफरखानाच्या हवाली केला; आणि त्यानें अलाउद्दीन- इसन- गंगु असं नाव धारण करून तो ता. १२ आगष्ट ६० सन १३४७ रोजीं राज्यपदारूढ झाला.
 अलाउद्दीन शहा हा गादीवर आल्यावर त्यानं आपल्या राजधानीचे शहर दौलताबाद में बदलून कलबुर्गा उर्फ गुलबर्गा हॅू केले. या राज्यास " बहामनी `राज्य अशी संज्ञा - असून त्याचा समावेश महाराष्ट्राच्या इतिहासांत होता. हसन हा दक्षिण प्रांताचा राजा झाल्यावर त्यानें गंगू ब्राह्मणास दिलेले वचन बरोबर पाळिले. त्या वेळे पासून तो आपल्या नांवा पुढे " गंगू बहामनी " हे उपपद जोड़ लागला, व त्यानें गंगू ब्राह्मणास मोठ्या सन्मानानें दिल्ली येथून गुलबर्गा येथे आणवून त्यास फडणिशी कामावर स्थापन केलें, व त्याचा योग्य इतमाम सुरू करून तो अखेर पर्यंत चालू ठेविला. हा सुलतान न्यायी व सदाचरणी असून तो हिंदु धर्म द्वेष्टा नव्हता; अथवा मुसलमानी धर्माचाही कट्टा अभिमानी नव्हता. त्या मुळे त्याने आपल्या राज्यांतील हिंदू प्रजेचा धार्मिक बाबतींत कोणत्याही प्रकारें छळ केला नाहीं. हें बहामनी राज्य व विजयानगरचे राज्य हीं दोन्हीं


 +हे शहर जी. आय. पी. रेलवेबर, पुणे - रायचूर मार्गावर, रायचूर पासून ९० मैलांवर निझामाच्या राज्यांत एक जिल्ह्याचे ठिकाण म्हणून आहे. हे शहर विजयानगरच्या माजीं राज्याच्या उत्तर दिशेस, व वारंगूळच्या पश्चिम दिशेस, अजमासें दीडशे मैलांवर असून दक्षिण प्रांताची पूर्व कालीन राजधानी, म्हणून तें भाजतागायत प्रसिद्ध आहे. प्रसिद्ध मुसलमानी साधू खाजा बंदा नवाझ अव- 'लिया याच्या सन्मानार्थ या टिकाणी दर नोव्हेंबर महिन्यांत मोठी यात्रा भरत असते. येथें फिरोजशहानें ( इ० सन १३९७ ते १४२२ ) स्पेन देशाच्या धर्तीवर एक मशीद बांधली असून ती हल्लीं अस्तित्वांत आहे; त्याप्रमाणे जुना मोड- कळींस आलेला किल्ला, व इतर इमारती, वगैरे पूर्व वैभवाची कांहीं अवशिष्ट चिन्हें आजही हग्गोचर होत आहेत.