Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५१ )

 भावी प्रसिद्ध राज्यकर्ता, व बहामनी राज्याचा मूळ पुरुष, अल्लाउद्दीनशहा ( इ. सन १३४७ ते १६५८ ) हा मूळचा गरीब स्थितितील मनुष्य असून तो दिल्ली येथे गंगू या नावाच्या एका ब्राह्मणाच्या आश्रयास राहिलेला होता. परंतु त्याचें इमानों वर्तन अनुभवास आल्यावरून तो हसन यास प्रेमाने वागवू लागला. गंगू याने हसन यांस शेती करण्याचे काम सोपविले होते त्याप्रमाणें तो एक दिवस होतांत जाऊन जमीन नांगरीत असतां त्यास त्या ठिकाणी एक मोहोराचा हंडा सापडला तो, हसन याने, त्यासंबंधी कोणताही अभिलाष न बाळगिता, तसाच आपल्या धन्यास नेऊन दिला; त्यामुळे गंगु ब्राह्मणास त्याच्या- बद्दल आदर बुद्धि उत्पन्न होऊन त्याचं कल्याण करण्याची तो संधी पाहू लागला. या गंगु ब्राह्मणावर दिल्लीपति महमद तुम्लख याची विशेष मेहेर नजर होती. त्यामुळे गंगू यानें सुलताना जवळ एक दिवस संधी साधून हसन याच्या इमानीपणाबद्दल तारीफ केली, त्यास बादशहाने कृपाळू होऊन योग्यतेस चढवावे, म्हणून विनंती केली; त्याप्रमाणे बादशहाने हसन यांस आपल्या पदरीं ठेवून घेतलं, त्यास दहा हजार स्वारांची सरदारी दिली; अशा रीतीने हसनचा भाग्योदय होण्यास प्रारंभ झाला तेव्हा गं ब्राह्मणाने त्याची पत्रिका पाहून "तुला राज्य प्राप्ति होईल; " असें भविष्य केले; व तसें झाल्यास, " तूं आपल्या नांवास गंगू हें उपपद जोडावेस, व मला फडणिशी अथवा खजिनदारी पदावर स्थापन करावेस," अशा बद्दल त्याचें वचन घेतले. यावेळी इस्मायलखान या नांवाचा बादशाही सुभेदार दक्षिणेतील कारभार पहात होता; त्याच्या मदतीस बादशहाने हसन याची दिल्लीहून दक्षिणेत रवानगी केली; परंतु, त्यानंतर, इस्मायलखानानें गुजराथेतील कित्येक बंडखोर सरदारांना आश्रय दिल्याची हकीकत बादशहास कळली; तेव्हां त्याचें पारिपत्य करण्या करिता तो दक्षिणेत आला; त्यावेळी सर्व सरदारांनी मिळून इस्मायलखानास दक्षिण प्रांताचा स्वतंत्र सुलतान बनविले व त्यास नासिर- उद्दीन असा किताब दिला; त्या प्रमाणेच हसन यांसही जाफरखान असा किताब देऊन, त्यास नासिरउद्दीनचा दुच्यम नेमिले इतक्यातच बादशहा ही या सरदार मंडळीवर चाल करून आला; परंतु तो इकडे आला न आला तोच, त्यास, दिल्ली येथे आपणा विरुद्ध मोठे थंड झाल्याची बातमी मिळाली; त्यामुळे या सरदार मंडळीचे पारिपत्य करण्यास आपले कांहीं सैन्य मार्गे ठेवून, तो मोठ्या लगबगीनें दिल्ली येथे परत गेला; तेव्हां हसन उर्फ जाफर-