Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५० )

 अनागोंदी येथील राज्याचा नाश झाल्यानंतर या आपत्तीतून वाचलेले सरदार व प्रजाजन यांनी या नवीन वसविलेल्या विजयानगर शहरांत येऊन वास्तत्र्य केलें, व लवकरच ते शहर अत्यंत भरभराटीप्रत येऊन पोहोंचले पुढें, सुलतान महमद यानें अनागोंदी येथील बंदोबस्त ठेवण्याकरितां नेमिलेला सरदार मलिक याच्या हांतून तेथील बंदोबस्त योग्य प्रकारें राहीना, म्हणून त्यानें हरी- हर यांजकडे ते राज्य सोपविले, व त्याचा भाऊ बुक याची त्या राज्याचा मुख्य प्रधान म्हणून नेमणूक केली. हे उभयतांही बंधू मोठे पराक्रमी असून त्यांनीं आपल्या राज्याच्या दक्षिणोत्तर दिशेकडील बराच मुद्रख जिंकून आपल्या राज्याचा विस्तार केला. व इ० स. १३४० मध्ये बदामी येथे एक किल्ला बांधला; हरीहर हा आपणास सुलतान महमद याचा मांडलीक समजून राज्य करीत असे; व सुल- तानाच्या तत्ते पासून आपण स्वतंत्र व्हावे, अशी त्याने केव्हाही खटपट केली नव्हती. तो इ० सन १३४४ मध्ये मृत्यू पावला. व त्याचा भाऊ बुक्क हा गादी- वर आला. हा मोठा पराक्रमी व कर्तृत्ववान असून त्याने छत्तीस वर्षे राज्य केले. याच्या कारकीर्दीत विजयानगरच्या राज्याची झपाट्याने भरभराट होण्यास प्रारंभ झाला त्यानें विजयानगर पासून विध्याद्रि पर्वता पर्यंतचा सर्व प्रदेश आपल्या अमलाखालीं आणिला: तथापि त्याची कारकीर्द इतर दृष्टीनेही महत्वाची आहे; कारण मुसलमानी स्वाऱ्यामुळे एकामागून एक हिंदू राज्ये नट होण्यास प्रारंभ झाला, त्यावेळी हिंदू राजेरजवाड्यांनीं परस्परांमधील मतभेद विसरून एकत्र व्हावें, व सर्वानी मिळून मुसलमानांच्या वाढत्या सत्तेचा कायमचा नाश करावा, अशा इच्छेने त्याने त्यांच्या विरुद्ध एक प्रबळ कट तयार केला व त्यति द्वार समुद्र येथील होयसल राजा बल्लाळ, वारंगूळचा माजी राजा रुद्रदेव, अथवा प्रतापरुद्र, याचा पराक्रमी मुलगा कृष्णदेव उर्फ कृष्ण नाईक, व दक्षिणेतील इतर हिंदू राजेरजवाडे, यांना सामील करून घेऊन मुसलमानांचा प्रतिकार करण्याची सिद्धता केली; तेव्हा हसन गंगू या नांवाच्या एका सरदारास महंमद तुलख याने त्यांच्यावर दक्षिणेंत पाठविले; परंतु या वेळीं या हिंदू राजांनीं त्याचा इतक्या जोराने प्रतिकार केला कीं, मुसलमानांच्या तात्र्यांतील तिकडील सर्व प्रदेश नाहींसा होऊन दौलताबाद शिवाय दुसरें एकही स्थळ कांहीं काळ पर्यंत. त्यांच्या ताब्यांत राहिले नाहीं.