Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४९ )

विजयानगर येथील हे घराणे यादव वंशातील होते अशाबद्दल भाधार उपलब्ध झाला असून दुसऱ्या हरीहराच्या कोरीव लेखांत " असिद सीम महिमा वंशे यादव भूभृतं अखंडित गुणोदारः श्रीमान्बुक्क महिपतिः " ( यादवराजांच्या 'घराण्यामध्ये बुक्क या नावाचा एक अत्यंत पराक्रमी राजा निर्माण होऊन गेला ) असे वर्णन केलेले आहे.


-प्राप्त झालेली आहे; " अशा प्रकारचे या विजयानगरचे वैभव असून तें 'मिळवून देण्यांत व त्याची वृद्धी करण्यांत या माधवाचायाने अतीशय प्रयत्न केले, व त्या मुळेच ते राज्य अत्यंत वैभव संपन्न व बलाढ्य बनले, असे म्हणणे अति- शयोक्तीचे होणार नाहीं.
 निकोलो कोट शिवाय इतर ही कांहीं प्रवासी विजयानगर येथे निरनिराळ्या काळी येऊन गेले असून त्यांनीं ही त्या राज्या संबंधी निरनिराळी हकीकत आपल्या प्रवास वृत्तांत ग्रंथित केली आहे; इ. सन १४७४ या वर्षी निकेटिन या नावाचा एक रशियन प्रवासी हिंदुस्थानांत येऊन विजयनगर येथें ही गेला होता; त्या वेळीं तेथील अपूर्व वैभव व त्या शहराची अभेद्य रचना पाहून स्थानेही असेच मोठे प्रसंशनीय उद्गार काढिले आहेत. तो म्हणतो:-
 " विजयानगर येथील हिंदू कदम वंशीय राजा, हा महा बलाढ्य आहे; स्पाच्या जवळ असंख्य सैन्य आहे; तो विजयानगर येथे पर्वतावर राहतो. है विस्तृत शहर तीन किल्ल्यांनी वेंष्टित असून त्याचे नदी मुळे दोन विभाग झालेले आहेत. त्या शहराच्या एका बाजूस भयंकर भरण्य पसरलेले असून दुसऱ्या बाजूस दरी आहे; व ती चमत्कृतीजन्य असून कोणत्याही कार्यास सांयस्कर, ब एका बाजूने तिच्यांत बिलकुल शिरकाव करितां येणार नाही अशी आहे. या शहराच्या बरोबर मध्य भागांतून एक रस्ता जातो, व खाली खोल दरी असलेला पर्वस उंच उंच होत जातो; व त्या मुळे हे शहर दुर्भेद्य बनून गेलेले आहे. " ) (The Hindu Sultan Kadam is a very powerful prince. He possesses a numerous army and resides on a mountain at Bichenegher. This vast city is surrounded by three forts and intersected by a river bordering on one side on a dreadful jungle and on the other on a dale a wonder- ful place and to any purpose convenient. On one side it is quite inaceessible; a road goes right through the town and as the mountain rises high with a ravine below, the town is impregnable." -Athannasins Nikitin, Soe A Forgotten Empire.