Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४८ )

आज्ञेने, अनागोंदीच्या समोर, तुंगभद्रेच्या दक्षिण तीरावर, विजयानगर या नांवाच्या एका शहराची स्थापना करून, त्या ठिकाणी एक बलाढ्य गादी निर्माण केली.


शृंगेरी येथील श्री शंकरचार्याच्या गादीवर बसलेला पहिला पुरुष असून, त्यावेळे पासून त्यास विद्यारण्य स्वामी हे नांव प्रात झाले; या स्वामीनें धर्म, नीति, तत्वज्ञान, न्याय व व्याकरण इत्यादि अनेक विषयांवर संस्कृत ग्रंथ व टिका लिहिलेल्या आहेत. या माधवाचार्यास सायणाचार्य या नांवाचा एक धाकटा भाऊ होता; तोही मोठा विद्वान असून त्याने वेद व उपनिषेधे यांजवर उत्कृष्ट व प्रचंड असें भाष्य लिहिलेले असून त्यावरूनच हल्लींच्या काळी सुद्धां वेदांचा अर्थ निश्चित करण्यांत येतो. त्याप्रमाणेच तो मुत्सद्दी ही अजून दुसन्या हरीहराच्या कार कीर्दीत तो मुख्य प्रधानाचे काम पाहात होता. माधवाचार्य हा पहिल्याने राजा संगम याच्यापटरी असून पुढे त्याचा मुलगा हरीहर याच्या आश्रयास तो राहिला: या स्वामीच्याच प्रोत्साहनानें व सांपत्तिक मदतीने, हरीहराने विजया- नगरच्या भावी बलाढ्य साम्राज्याची उभारणी केली. शिवाय विजयानगर ही राजधानी बसविताना तिचे स्थळ निश्चित करण्यांत ही त्यानें आपलं अलौकिक बुद्धिसाध्यं व्यक्त केले. निकोलो कोठे या नावाचा एक व्हेनीम येथील रहिवासी इ. सन १४२० मध्ये तेथून प्रवासास निवाला व संवायतेवरून दक्षिण- किनान्याखाली येऊन तेथून पायरस्त्याने तीनशे मैलांचा प्रवास करून तो विज- यानगर येथे गेला व तेथे कांहीं तो मुक्काम करून राहिला. या अवधीत त्यान तेथील एकंदर परिस्थिति प्रत्यक्ष पाहून जे वर्णन केलें तें मोठें महत्वाचे व मननीय आहे तो म्हणतों "विजयानगर है शहर एका उंच डोंगराच्या पायथ्याशी असून त्याचा घेर साठ मैलांचा आहे. शहराच्या सभोंवतीं तट बांधिला असून त्याच्या भिंती पर्वत प्राय उंच व दन्याखो-यांनी वेष्टून गेलेल्या आहेत या राज्यात पाहिजे तेव्हा तयार असे, शहाण्णव हजार सैनिक लढाईस सिद्ध आहेत. येथील श्रीमंत लोकांची राहाण्याची बरें व वाडे दगडी असून शहर-- भर पाण्याचे कालवे फिरविलेले आहेत. शहरांत मोठमोठे बाग बगीचे असून आसपास केस व तांदूळ यांचे पुष्कळ पीक उत्पन्न होते. या राजधानींत ठिक- ठिकाणी भव्य व मनोहर देवालये असून ब्राम्हणांच्या पाठशाळा ही पुष्कळ: आहेत; मोटे वाडे, मंदिरें व गोपुरं वगैरे मुळे या शहरात अवर्णनीय शोभा