Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४७ )

प्रकारच्या दोन बलिष्टांच्या भांडणांत प्रत्यक्ष तर राहोंच, पण अप्रत्यक्ष रित्याही भाग घेणे, अथवा मदत करणं, मोठ्या धोक्याचे असते इतकेंच नाहीं तर अशा वड्या लोकांच्या, अथवा चलिष्यांच्या, खडाजंगीच्या महत्व स्थापनेसंबंधीच्या भांडणांत, व चिकाटीच्या स्पर्धेत दु. पिणाने वागण्यांत यति । चितही हयगय झाली, तर त्यामुळे स्वत:चा नाये आपण होऊनच आपणावर ओतून आणण्यासारखं होतं, ही गोष्ट त्या राज्यकत्याने लक्षांत घ्यावयास पाहिजे होतो; शिवाय शरण आलेल्यास अभय देणे, ही धर्मनीति पाळिताना स्वतःचे बलाबल व साधन सामुग्री याचा ही योग्य विचार त्यानें करावयास पाहिजे होता; परंतु कोणत्याही दृष्टीने त्याने विचारपूर्वक आचरण न केल्यामुळे त्याचे परिणाम त्यास व त्याच्या राज्यात पूर्णपणे अनिष्ट असे भोगणे प्राप्त झाले. अनागोंदी येथील राजानें बहुद्दीन बांस आश्रय दिल्याचे मुलतान महंमद यांस कळल्यावर त्यास अनागोंदीच्या राजाचा अतीशय राग आला व त्याने त्याच्यावर मोठ्या तडफीने स्वारी केली. अनागोंदीच राज्य लहान, आणि मुलतानासारख्या बड्या सत्ताधीशाच्या जोरदार वारीचा प्रतिकार करण्यास तर अगदीच कमकुवत होते; तरी सुद्धां अनागोंदी कराने महमंदाच्या सैन्याचा कांहीं काळपर्यंत मोठ्या शौर्याने व निकराने प्रतिकार केला; व अखेर किल्ला पाडाव होऊन आपण शत्रूच्या हातीं जिवंत सांडणार, अशी त्याची खात्री झाल्यावर त्याने आपल्या सरदार वगैरे मुख्य मंडळींच्या स्त्रिया व मुले एकत्र करून त्या सर्वांची अमीत आहुती दिली; व आपल्या शर सरदारासह मोठ्या आवेशाने शत्रू सैन्यावर तुटून पडून अखेरीस सर्वांसह तो युद्धांत मारला गेला. मुलतान महमंद यानें अनागोंदीचं राज्य आपल्या ताब्यांत घेतलें, व तेथें मलिक या नांवाच्या आपल्या एका सरदाराची नेमणूक करून तो दिल्ली येथे परत गेला; अशा रीतिनें अनागोंदीचा पाडाव झाल्या नंतर हरीहर च बुक यांनी आपला गुरु माधवाचार्य अथवा विद्यारण्य स्वामी याच्या


 + भाववाचार्य, विद्यारण्य स्वामी, हा मोठा मुत्सद्द व राजकारणी साधु पुरुष असून, शिवाजीच्या समर्थ रामदास स्वामी, या गुरू प्रमाणे, त्याची अलौकिक योग्यता होती. हा मोठा कर्तबगार असून त्यानें समर्था प्रमाणेच राज्य धर्म या दोहोंचा मिलाफ करून विजयानगरचें राज्य भरभराटीस आणिलें, हाच