Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४६ )

 महाराष्ट्रांतील प्रसिद्ध यादव उर्फ जाधव घराणे इ. सन १३१८ मध्ये नष्ट झाल्यावर फक्त अठराच वर्षांत म्हणजे इ. सन १३३६ या वर्षी, हिंदु- स्थानच्या दक्षिण द्वीपकल्पांत दुसरें एक अत्यंत प्रबळ व वैभव संपन्न अ विजयानगरचे हिंदू राज्य निर्माण झाले; विजयानगर हे ठिकाण मद्रास इला- ख्यांतील बल्लारी जिल्ह्यांत असून त्यास हंपी असे ही नाव आहे. इ. सन १२९३ पासून मुसलमानानीं नर्मदा नदी ओलांडून दक्षिणेवर स्वाया करण्यास सुरवात केली, व इ. सन. १३१८ मध्ये त्यांनीं देवगिरी येथील राज्य नष्ट केल्यावर इ. सन १३२३ मध्ये वारंगळ काबीज करून घेतलं; विजयानगर है गांव तुंग- भद्रा नदीच्या दक्षिण तीरावर असून तिच्या उत्तर तीरावर अनागोंदी या नांवाचें एक तटबंदी केलेलें शहर होते. व ते एका लहानशा राज्याची राजधानी म्हणून होते. हे राज्य इ. सन ६५० च्या सुमारास स्थापन झाले असून ते पुष्कळ काळपर्यंत द्वार समुद्र येथील होयसल बल्लाळांचे मांडलीक होते. इ. सन १३१० मध्ये अलाउद्दीन यात्रा सरदार मलिक काफूर याने म्हैसूर मधील या होयसल बल्लाळाची राजधानी द्वार समुद्र ही नामशेष केली, आणि इ. सन १३२६ मध्ये वारंगळवादी कायमचा पाडाव झाला. तेव्हां तेथील राजाच्या पदरी असलेले हरीहर व बुक्क हे दोन कर्तृत्ववान बंधू अनागोंदी येथील राज्यकर्त्याच्या आश्र यास आले, व त्यानेही त्यांची योग्यता लक्षांत घेऊन त्यांना अनुक्रमे दिवाणगिरी व खजिनदारी या जबाबदारीच्या अधिकारावर स्थानापन्न केलें. मुसलमान लोकांच्या स्वान्यामुळे, या काळात आसपासची बरीच हिंदू राज्य हादरून बोलीं होतीं, व कांहीं तर त्यांनी नामशेष करून टाकिली होती; तरी त्यामुळे या अनागोंदीच्या छोट्या संस्थानावर सन १३३४ पर्यंत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रित्याही कोणता सुद्धां धातुक परिणाम घडला नव्हता; परंतु त्यानंतर अकल्पित रित्या एक निराळेच कारण उपस्थित झाले; व त्याचा परिणाम अखे- रोस त्या राज्यास अत्यंत हानिकारक रीतीन भोगावा लागला !
 इ. सन १३४२ मध्ये दिल्ली येथील बादशाहा महमद तुघ्लव याचा पुतण्या बहुद्दीन यानें बादशहा विरुद्ध दंड उभारिले, व तो दक्षिणेत निघून येऊन त्यानें अनागोंदी येथील राजाचा आश्रय मागितला व त्यानेही कोताही विचार न करिता बहुद्दीन यांस आश्रय दिला. वास्तवीक म्हटले म्हणजे अशा