Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४५ )

अद्रिदुर्ग वगैरे नार्वे होतीं; व दुसऱ्या जटिगानें या दुर्गावरूनच आपणास अद्रि- दुर्ग केसरी - अथवा "अद्रिदुर्गाचा सिंह" असा किताब धारण केला होता. या जटिगाच्या मागून त्याचा मुलगा गोकल - गोम्मक उर्फ गोम्क-हा गादीवर आला. हा बराच पराक्रमी असून त्याचा कन्हाड, मिरज, कुंडल, वगैरे प्रदेशावर अंमल होता; व त्यानें दक्षिण कोंकण प्रांतावर ही स्वारी केली होती. गोकल्ल नंतर त्याचा भाऊ गूवल, त्यानंतर गोकलचा मुलगा मारसिंह, त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा गुवल, नंतर त्याचा भाऊ भोज, त्यानंतर त्याचा भाऊ बल्लाळ, व नंतर गंडरादित्य, हे अनुक्रमे गादीवर आले. यापैकी गंडरादित्य हा विशेष शुर, उदार, व मोठा न्यायी असा राज्यकर्ता होऊन गेला. त्याने दक्षिण कोकण प्रांतावर स्वारी करून तिकडील शिलाहार शाखा नामशेष केली, व तो प्रदेश आपल्या अमलाखालीं आणिला. त्यानंतर विजयार्क, व नंतर त्याचा दुसरा मुलगा भोज (दुसरा) हे गादीवर आले. या भोज राजाच्या कारकीर्दीत यादव वंशीय सिंघण यानें में राज्य जिंकून आपल्या राज्यास जोडिलें व अशा रीतीने या घराण्याचा शेवट झाला.
 शिलाहार है शिवोपासक असून श्री महालक्ष्मी ही त्यांची कुलदेवी होती; त्यामुळे " श्री महालक्ष्मी लब्धवर प्रसाद" अशी पदवी हे राज्यकर्ते आपल्या नांवास जोडीत होते. या शिलाहार घराण्याची राजधानी प्रथम बळि " वडे, नंतर कोल्हापूर, व शेवटीं पन्हाळा, या ठिकाणीं होतीं. हे राज्यकर्ते वैदिक धर्म पाळीत असत; तथापि जैन धर्मास ही त्यांनी आश्रय दिला होता; कोल्हापूर प्रांतातील आजरें या नावाच्या पेटयाच्या ठिकाणी त्यांनी एक बस्ती बांधली होती; व राजा गंडरादित्य यानें तर तीन देवालये बांधवून त्यांत शंकर, बुद्ध, व अईत, ( जैन ) यांच्या मूर्तीची स्थापना केली होती. या शिलाहार राज्यकर्त्यांच्या देणग्यांत कन्हाडे ब्राम्हणांचे नांव असून कोकणांतील कशेळी हा गांव "भागवत" या उपनांवाच्या कन्हाडे ब्राम्हणास त्यांनी "अग्रहार'" म्हणून बक्षीस दिला होता, असा उल्लेख आढळतो. शेलार या उपनावाची' मराठयांची पुष्कळ घराणी आजही अस्तित्वात आहेत, व खंडाळे व पुणे यांच्या दरम्यान हल्ली रेलवे स्टेशन असलेले शेलार वाडी हे ठिकाण मूळने शिलाहारांचे असावें, असा तर्क आहे.
 १०