Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४४ )

त्याचे दुखणे बळावले, व तो पुढे लवकरच मृत्य पावला. ( इ. सन १३१६ परंतु त्याच्या मृत्यू मुळे हरपाळचा कोणत्याही प्रकारें फायदा झाला नाहीं; अथवा दक्षिण देशास हा स्वातंत्र्य लाभ ही फार दिवस उपभोगावयास मिळाला. नाहीं. कारण अल्लाउद्दीन नंतर त्याचा तिसरा मुलगा मुबारिक खिलजी ( इ. सन १३१६ ते इ. सन १३२० ) हा गादीवर आला; तेव्हां त्याने स्वतःच दक्षिण प्रांतावर स्वारी केली, व हरपाळ यांस कैद करून जिवंतपणीं त्याच्या सर्वांगाची कांतडी सोलवून, त्याचे भयंकर हालहाल करून, त्यास ठार मारिलें.. त्या नंतर यादव वंशीय घराण पार नामशेष झालें, आणि महाराष्ट्र देशावर मुसलमानी अंमल पूर्णपणे प्रस्थापित होऊन बसला.
 महाराष्ट्र देशावर ज्या प्रमाण देवगिरी येथील यादव अथवा जाधव घरा- ण्याचा इ. सन १३१८ पर्यंत अंमल होता, त्या प्रमाणेच शिलाहार उर्फ शेलार घराण्याचा इ. सन ९४९ पासून इ.सन १२०५ पर्यंत कोल्हापूर - पन्हाळा प्रांतावर अंमल चालू होता. या घराण्याच्या तीन शाखा असून त्या तीन्हीं ही आपली उत्पत्ति विद्यावर गंधर्वाच्या गणाचा राजा जो जिमूतकेतू त्याचा मुलगा जिमूतवाहन याच्यापासून झालेली आहे असे मानितात. या शिलाहार घराण्याचा एक वंश तगर येथे राज्य करीत असून त्याव " तगर पूरवराधीश्वर" असा किताब होता. निशामशाहीतील धारूर च पूर्वीचें प्रख्यात असलेलें तगर हें शहर होय, असें मानितात व कित्येक पुणे जिल्ह्यातील हल्लींचे जुन्नर हे तालुक्याचे ठाणे- हेच त्या काळचे तगर हे शहर होय, असे म्हणतात. या तीन घराण्यांतील एक घराणे उत्तर कोंकण प्रांतावर राज्य करीत असून त्या राज्याच्या हद्दीत १४०० गांवें होतीं, व त्याच्या राज- धानीचे शहर पुरी है होते. या वंशाचे दुसरें घराणं शाणफुल्ल या नांवाच्या पुरुषाने स्थापन केलें होतें; व दक्षिण कोंकणचा प्रदेश त्याच्या ताब्यांत असून त्याची राजधानी खारेपाटणच्या आसपास होती. तिसरे घराणे करवीर उर्फ कोल्हापूर, मिरज, व कन्हाड, या तीन प्रांतांवर, व पुढे दक्षिण कोकणवर ही, राज्य करीत होते. या घराण्यातील मूळ पुरुष अथवा पहिला राज्यकर्ता जटिग हा असून त्याच्या मृत्यू नंतर त्याचा मुलगा नायिबमे उर्फ नायिम्म, त्या नंतर त्याचा मुलगा चंद्रराज, व त्यानंतर त्याचा मुलगा दुसरा जटिम, हे अनुक्रमे गादीवर जाले. बांच्या राजधानीचे शहर पन्हाळा हे असून त्यास पद्भनाल, पद्धदुर्ग, पन्नालदुर्ग