Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३ )


राज्याची हकीकत; पान १४६-४७; त्या राज्याचा नाश व विजयानगरच्या राज्याची स्थापना; पान १४७-४८; हरीहर व बुक यांची कारकीर्द; पान १४९- ५०; बहामनी राज्य संस्थापक अल्लाउद्दीन शहा याची, व बहामनी राज्याच्या संस्थापनेची हकीकत; पान १५१-५२; अल्लाउद्दीनशहाचा मृत्यू; महंमदशहाचे राज्यारोहण त्याचें विजयानगरकर बुक राजाशीं युद्ध; व बुकचा पराजय; पान १५३-२४; हरीहर दुसरा, बुक्क दुसरा, व त्याच्या मृत्यूनंतर त्याचा भाऊ देवराय याचे राज्यारोहण, बहामनी राज्यकर्ता फिरोजशहा याने कपटानें रामरायाच्या मुलास ठार मारिलें, व देवरायाचा पराभव केला; पान १५४-५५; देवराय व फिरोजशहा या उभयतां राज्यकर्त्यांमधील स्त्री विषयक भानगड, व तिचे देवरायास भोगावे लागलेले अनिष्ट परिणाम; पान १५५-६०: देवरायाचा मृत्यू; वीरविजय व त्या नंतर दुसरा देवराय यांची कारकीर्द; पान १६०-६१; दुस-या देवरायाचा मृत्यू; व तिसन्या देवरायाची कारकीर्द: पान १६१-६२; are घराण्याची स्थापना; नरसिंहराय, वीर नरसिंहराय, व कृष्ण देवराय यांची कारकीर्द; पान १६२-६४; कृष्ण देवरायाचा मृत्यू; अच्युतराव गादीवर येतो; त्याची नालायकी, दुर्बलता, व दुष्ट आचरण; तिम्मराजाचा वडील मुलगा रामराय हा विजयानगरच्या राज्याचा कुल मुखत्यार होतो: पान १६४-६५, राम- रायाची कारकीर्द; तो मुसलमान राज्यकर्त्यांना निरनिराळ्या प्रसंगी व प्रकारची मदत करितो; त्यांचा व त्यांच्या वकिलांचा उपमर्द, आणि त्यांना चीड उत्पन्न होणारी कृत्ये करतो; पान १६५ - ६८ : रामरायाच्या उद्दाम व आगळिकीच्या वागणुकीमुळे मुसलमान राज्यकर्त्यांची त्याच्या विरुद्ध जूट झाली; पान १६८- ६९; तालीकोट जवळील भयंकर युद्ध; रामरायाचा पराजय होऊन त्याचा वध झाला; युद्धाचे अनिष्ट, व विध्वंसक परिणाम; व त्या संबंधी विवेचन; पान १६९- १७३; विजयानगरच्या राज्याचा नाश व त्या शहराची मुसलमानी सैन्याने उडविलेली धूळधाणी; रामरायाप्रमाणेंच त्याचा भाऊ व्यंकटाद्रि याचा नाश झाला; पान १७३-७४; तीरूमल्ल पार्ने सदाशिवरावाचा खून करून पेनकोंडा : येथे आपले एक लहानसे राज्य स्थापन केलें; पान १७४-७५; त्याचा वंशज श्रीरंगगय याच्या पासून, इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी तर्फे, फ्रान्सिस डे यानं, मद्रास शहराची जागा मिळविली; मद्रारा शहराची स्थापना; पान १७५;