Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४० )

बुंदेलखंडावरून प्रथमत: वन्हाडांतील एलोचपूर या शहरापर्यंत येऊन तो पश्चिमे कडे वळला, व झपाट्याने कूच करीत देवगिरीच्या तटाखालीं एकदम येऊन "प्रगट झाला. रामदेवरावास अल्लाउद्दीन याच्या या स्वारीची यत्किंचितही बातमी मिळालेली नव्हती; त्यामुळे तो असावध असून अल्लाउद्दीन बरोबर युद्धास उभे - राहण्याची त्याची कोणत्याही प्रकारें तिळमात्र सुद्धां तयारी नव्हती; शिवाय - त्याची मुख्य फौज ही राजधानींतून दुसरीकडे गेली होती; तथापि त्यानें हिंमत- 'घरून अजमासँ चार हजार सैन्य मोठ्या लगबगीने गोळा केलें, व अलाउद्दीन • बरोबर युद्धास सुरवात केली; रामदेवरावाचें मुख्य व कसलेले सैन्य, जे बाह्य प्रदेशी गेले होतें तें, जर राजधानींत हजर असतें तर, अल्लाउद्दीन यांस त्या सैन्याबरोबर टक्कर देऊन विजय मिळविणें जवळ जवळ अशक्य झाले असते. परंतु नौकर चाकर व इतर बिन अनुभवी भरती मिळून बनविलेल्या या चार हजार कच्या सैन्याचा, संखेच्या व शौर्याच्या दृष्टीने, भल्लाउद्दीनच्या सैन्यापुढें निभाव लागणे पूर्णपणे अशक्य होते. त्यामुळे रामदेवाचा पराभव होऊन - त्यास माघार घेणे, व किल्ल्यांत आश्रयास जाणे, भाग पडले. रामदेवरावानें किल्ल्याचा आश्रय केल्यानंतर अल्लाउद्दीन यांस आयतेच फावले, व त्यानें किल्लयाबाहेरील सर्व शहर लुटून किल्ल्यास ही वेढा दिला. तथापि रामदेवरावाचे बाहेर गेलेले सैन्य परत आल्यास आपणास खात्रीने धोका होईल, ही गोष्ट तो 'पूर्णपणे ओळखून होता; म्हणून " मी फक्त थोडेसे सैन्यच कायतें पुढे घेऊन आलेलों असून बादशाही मुख्य व मोठी फौज मागाहून येत आहे " अशी त्यानें कंडी पिकविली, व तिचा परिणाम त्याच्या अंदाजाप्रमाणे त्यास इष्ट असाच घडून आला. कारण ही हकीकत रामदेवरावास कळल्यावर त्यास ती खरी वाटून अत्यंत भीती उत्पन्न झाली, व तो अल्लाउद्दीन बरोबर तह करण्यास कबूल होऊन त्याप्रमाणे उभयतांमध्ये तह झाला. इतक्यांत रामदेवरावाचा मुलगा शंकरदेव हा बाहेरून बरंच मोठे सैन्य जमवून अल्लाउद्दीन बरोबर युद्ध कर- 'ब्याकरिता आला; ही गोष्ट रामदेवराव यांस समजल्यावर त्यानें शंकर - देवास "अल्लाउद्दीन बरोबर तह झाला आहे, सबब युद्ध करूं नये; " असा निरोप पाठविला; परंतु शंकरदेवाने ते मनावर न घेता अलाउद्दीन बरोबर युद्ध सुरू केलें. त्या वेळी आपल्या सैन्यांतील एक - हजार निवडक सैन्य मार्गे ठेवून अल्लाउद्दीन हा स्वतः युद्धास भाला, व उभ-